भाऊसाहेब निंबाळकर
Appearance
![]() | |
वैयक्तिक माहिती | |
---|---|
पूर्ण नाव | भाऊसाहेब बाबासाहेब निंबाळकर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
जन्मदिनांक | १२ डिसेंबर, इ.स. १९१९ |
जन्मस्थान | कोल्हापूर, ब्रिटिश भारत |
मृत्युदिनांक | ११ डिसेंबर, इ.स. २०१२ |
मृत्युस्थान | कोल्हापूर, भारत |
संकेतस्थळ | [१] |
खेळ | |
देश | भारत |
खेळ | क्रिकेट |
व्यावसायिक पदार्पण | इ.स. १९३९ |
भाऊसाहेब निंबाळकर (जन्म- १२ डिसेंबर इ.स. १९१९ मृत्यू- ११ डिसेंबर २०१२) हे महाराष्ट्र संघाकडून प्रथम वर्गीय क्रिकेट खेळलेले खेळाडू होते.[१] महाराष्ट्रातर्फे रणजी स्पर्धेत एका डावात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. १९४८-४९ च्या हंगामात पुणे येथे काठियावाड संघाविरुद्ध नाबाद ४४३ धावांची खेळी भाऊसाहेबांनी केली होती. काठियावाडच्या कर्णधाराने सामनाच सोडून दिल्याने भाऊसाहेबांची डॉन ब्रॅडमनचा तत्कालीन विक्रम मोडण्याची संधी हुकली होती. ४४३ धावा हा आजही भारतीय प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा डाव आहे; तसेच भारतीय प्रथमश्रेणीतील हे आजवरचे एकमेव चतुःशतकही आहे.[२]