सातारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भवानी पेठ, सातारा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


साताऱ्यातील प्रमुख पर्यटनस्थळे:

कास पठार - विविध रंगांची, विविध आकारांची फुले येथे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. सण-२०१२ मध्ये कास पठाराला "जागतिक वारसा" म्हणून संबोधले गेले आहे. जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. पर्यटकांसाठी घाटाई फाटा येथे विनामूल्य वाहन स्थळ उपलब्ध आहे. वाहन स्थळापासून पुष्प पठारावर जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे.

कास पठारावरील रस्त्यावर फिरण्यासाठी सह्शुल्क सायकलची व्यवस्था आहे. कास पठारावर घाटाई देवी,कास तलाव, वजराई धबधबा, सह्याद्री नगर पवन चक्की प्रकल्प, एकीव धबधबा, शिवसागर जलाशय इत्यादि प्रेक्षणीय स्थळे आहेत.

ठोसेघर- प्रसिद्ध धबधबा आहे

महाबळेश्वर- हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे.पावसाळा ऋतू(जून ते सप्टेंबर) सोडून इतर सर्व वर्षभर पर्यटक येथे थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.वेण्णा तलावातील बोअटींगचा अनुभव घेऊन घोडेस्वारी करत महाबळेश्वरची पर्यटन सफारी पूर्ण केली जाते.

अजिंक्यतारा - सातारामधील अजिंक्यतारा किल्ला ११ शतकात दुसरा भोज राजाने बांधला. या किल्ल्यावर आयुर्वेदिक व दुर्मिळ वनस्पती आहेत .

सज्जनगड - रामदासस्वामी यांची समाधी आहे.

जरंडेश्वर - हनुमान मंदिर आहे.येथे जाण्यासाठी तीन बाजूंनी रस्ता आहे.एका बाजूने मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत.त्यामुळे ट्रेकिंग करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

औंध -येथील संग्रहालय प्रसिद्ध आहे येथे यमाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे

शिखर शिंगणापूर- महाराष्ट्राचे कुलदैवत शंभू महादेव मंदिर आहे. जवळच गुप्तलिंग आहे पावसाळ्यात येथील दृश्य पर्यटकांना आकर्षित करते.

पाचगणी- टेबललेंड प्रसिद्ध आहे. येथे नामांकित निवासी शाळा आहेत.

वाई - येथिल महागणपती मंदिर प्रसिद्ध आहे.

भिलार- हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.येथे येणाऱ्या प्रत्येक वाचन प्रेमींसाठी गावातील प्रत्येक घरात वाचनासाठी स्वतंत्र खोली आहे आणि विविध विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत.

प्रतापगड- येथे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला .

मेणवली- नाना फडणीस यांचा राजवाडा प्रसिद्ध आहे.

मायणी- पक्षी अभयारण्य आहे.

नागनाथवाडी - येथिल नागनाथमंदिर प्रसिद्ध आहे.

पाठखळ - पाटखळ माथ्यापासून काही अंतरावर -सात मोटेची विहीर प्रसिद्ध आहे.

तापोळा- नौकाविहार

मांढरदेवी -वाई येथून जवळपास काळूबाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे .या देवीलाच मांढऱदेवी असे म्हणतात.

गोंदवले- येथे गोंदवलेकर महाराज मंदिर प्रसिद्ध आहे.

कराड - प्रीती संगम हे ठिकाण पर्यटना साठी प्रसिद्ध आहे.

कराड - कृष्णा कोयना संगम या ठिकाणी विहंगम दृश्य पहावास मिळते प्रीती संगम म्हणुन प्रसिद्धआहे या ठिकाणी जवळच लेणी आहेत.

पुसेगाव - संत सेवागिरी महाराज मंदिर

नेर - सुंदर तलाव व येरळा नदी

पाटण- कोयनानगर धरण परिसर

कासतलाव- पर्यटना साठी प्रसिद्ध आहे नौका विहार व तीन नदयाचा संगम या ठिकाणी विलोभनीय व निसर्गरम्य परिसर असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करतो.

समर्थ घळ- या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी ध्यान , चिंतन करत.

कास तलाव - सातारा शहरासाठी या धरणाच्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात

शैक्षणिक संस्था[संपादन]

रयत शिक्षण संस्थेने १९६१ साली सातारा येथे या महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. सातारा शहरातील व ग्रामीण भागातील मुलीना उच्च् दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी महाविद्यालय सुरु केले आहे. याठिकाणी बी. ए., बी. कॉम., बी. सी. ए., एम. ए., एम. कॉम. अश्या उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.

रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय हे १९६१ साली सुरु झालेले आहे. सातारा जिल्ह्यात हे एकमेव वाणिज्य महाविद्यालय असून शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयाला स्वायत्त(Autonomous Status) दर्जा मिळाला असून रयत शिक्षण संस्थेचे हे पहिले स्वायत्त महाविद्यालय आहे. NAAC बंगलोर यांचेकडून २०१७ साली महाविद्यालयाला A+ हा दर्जा मिळाला आहे. हे महाविद्यालय पूर्वी छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये समाविष्ठ होते.

महाविद्यालयात B.Com., M.Com., B.C.A. B.Voc. इ. विविध कोर्सेस सुरु आहेत. B.Com Regular, B.Com.( B.M.), B.Com. (I.T.) M.Com Regular, M.Com. (B.M.) , M.Com.( IT), B.C.A., B.Voc.असे विवध पर्याय उपलब्ध आहेत.

महाराजा सयाजीराव विद्यालय ही महाराष्ट्राच्या सातारा शहरातील शाळा आहे. ही शाळा पोवई नाक्यावर असून येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची समाधी आहे. हा शाळा ५ वी ते १० वी पर्यंत आहे.

चितळी
village
Country भारत ध्वज India
State Maharashtra
District Satara
Taluka Khatav
शासन
 • संस्था Grampanchayat
लोकसंख्या (२०११)
 • घनता /किमी2 (/चौ मै)
Languages
 • Official Marathi
वेळ क्षेत्र IST (यूटीसी+5:30)
PIN 415538
Telephone code auto
वाहन नोंदणी क्रमांक MH-11
Website http://www.chitali.com

स्थान[संपादन]

सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्या मध्ये आहे. महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागात हा जिल्हा आहे. उत्तरेस निरेच्या प्रवाहाने पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमा ठरते. पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांगा आहेत जे रत्नागिरी व सातारच्या सीमेवर आहेत. दक्षिणेस सांगली जिल्हा व पूर्वेला सोलापूर जिल्हा आहे.

खाद्यसंस्कृती:

सातारी कंदी पेढे, सुपनेकर वडा, मॅप्रोची उत्पादने याशिवाय असंख्य पदार्थ येथे मिळतात. तसेच साताऱ्यातील खाद्यपदार्था मध्ये चिरोटे हा एक पदार्थ प्रसिद्ध आहे.

[१]

  1. ^ "John Distilleries - Manufacturing". John Distilleries. John Distilleries, India. 20 June 2018 रोजी पाहिले.