भट चंडोल (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Singing Bush Lark RWD3

.

भट चंडोल, गायक चंडोल, भात चंडोल (शास्त्रीय नाव:Mirafra Javanica Cantillans(Blyth); इंग्लिश:Singing Bush Lark; हिंदी:अगन, अगिन, चरचरा; संस्कृत:अग्निकंठ, क्रकराट, मधुर क्षुपकृकराट; गुजराती:अगन; कन्नड: हाडुव भारद्वाज) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी मध्यम आकाराच्या लाव्याएवढा असतो व हा पक्षी पंख फडफडवीत मंद गतीने उडणारा चंडोल म्हणून ओळखला जातो.त्याच्या पंखावर तम्बुस पट॒टे असतात त्याची शेपटीची बाहेरील पिसे पंढरी असतात व हा पक्षी झुडपांत बसलेला असताना किव्हा उडताना गात असतो.

भट चंडोल हा पक्षी जास्तीत जास्त नावासी,पाकिस्तान,काश्मीर,हिमाचल प्रदेश,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,बिहार,पश्चिम बंगाल आणि दक्षिणेकडील भारतीय द्वीपकल्प येथे आढळतो.हा पक्षी मार्च ते सप्टेंबर या काळात विशेषतः जूनच्या मध्यात तो दिसतो.

याचे राहण्याचे ठिकाण हे माळराने,भातशेतीचा प्रदेश आणि गवती कुरणे ही आहेत.

Singing Bush Lark RWD

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली