ब्लॅक फॉरेस्ट वणवा
Jump to navigation
Jump to search
ब्लॅक फॉरेस्ट वणवा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात लागलेला वणवा होता. ही आग जून ११, इ.स. २०१३ रोजी लागली होती. नंतर पडलेल्या पावसाच्या मदतीने अग्निशामकांनी जून १९ च्या सुमारास ही आग आटोक्यात आणली
ही आग कॉलोराडो स्प्रिंग्जच्या ईशान्येस १० किमी अंतरावर ब्लॅक फॉरेस्ट या अरण्यवजा भागात सुरू झाली. जून १४पर्यंत या आगीत दोन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आणि ५०९ घरे पूर्णतया जळून गेली. या आगीमुळे ५५ वर्ग किमी भागातील ४१,००० व्यक्ती विस्थापित झाल्या होत्या.[१] हा वणवा कॉलोराडोच्या इतिहासातील सगळ्यात खर्चिक वणवा होता.