मोबाईल फोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्र्ह्मन्ध्वनी या पानावरून पुनर्निर्देशित)
आधुनिक मोबाईल फोन

भ्रमणध्वनी हे एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण (यंत्र) असून याचा दूरसंचारासाठी उपयोग केला जातो. याला इंग्रजीमध्ये मोबाईल फोन (मोबाईल) किंवा सेल्युलर फोन (सेल फोन) असे म्हणतात. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करता येते. आज भ्रमणध्वनी माणसाच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एकाच जागी ठेवून वापरावी लागतात.

जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात.

आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज महाजाल (इंटरनेट) न्याहाळणे, लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडियो ऐकणे, जीपीएस वापरणे, पैसे देणे, काढणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. नोकिया, मोटोरोला, अ‍ॅपल, सीमेन्स, सॅमसंग या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी काही सर्वात मोठ्या कंपन्या आहेत.

दूरसंचारविषयक सेवांसाठी मोबाईल फोनमध्ये सिम कार्ड वापरणे आवश्यक असते. भ्रमणध्वनीमुळे माणसे जोडली गेली आहेत. मोबाईलमुळे सर्व जग जवळ आले आहे. मोबाईल स्थितीचे स्थान स्थान-आधारित सेवांसाठी वापरले जाऊ शकते. याला मोबाईल फोन ट्रॅकिंग असे म्हणतात.

मोबाईल फोनचा विजेरी संच[संपादन]

मोबाईल फोनचा विजेरी संच हा सदैव उत्क्रांत होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र त्याच वेळी विजेरी संच फुटल्यामुळे अपघात होत आहेत. मात्र त्यांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. तरीसुद्धा हा धोका ओळखून अनेक मोठ्या भ्रमणध्वनी निर्माण करणाऱ्या कंपन्या या यावर अधिक लक्ष ठेवून आहेत व त्यावर संशोधन कार्यही सुरू आहे.

विजेरी संच काळजी[संपादन]

  • मोबाईलचा विजेरी संच मर्यादेपलीकडे चार्ज (ओव्हरचार्ज) करू नये. कोणताही रीचार्जेबल संच मर्यादेपलीकडे चार्ज केला असता (ओव्हरचार्ज) खराब होतो. तसेच त्याचे आयुष्य कमी होते. ओव्हरचार्ज होत असताना बॅटरी फुटू शकते.
  • मोबाईलचा विजेरी संच खिशात किंवा पर्समध्ये ठेवू नका. कारण त्याच्या टर्मिनलचा धातूच्या नाण्यांशी संपर्क आल्यास बॅटरी शॉर्टसर्किट होऊन डिसचार्ज होऊ शकते किंवा गरम होऊन फुटू शकते.
  • मोबाईल फोनवर चार्जिंग लावून कोणाशी बोलू नका, त्यामुळे मोबाईल फोनची बॅटरी फुटू शकते.
  • रात्री झोपताना मोबाईल फोन उशीजवळ ठेऊ नका त्यामुळे आपल्याला डोकेदुखी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.
  • वाहन चालवताना मोबाईल वापरू नये.

उत्क्रांती[संपादन]

मोबाईल वापर प्रणालीचे प्रकार १) ॲड्रॉईड २) ब्लॅकबेरी ३) विंडोज ४) आयफोन

शोध[संपादन]

मोटोरोला ही हॅंडहेल्ड मोबाईल फोनची निर्मिती करणारी पहिली कंपनी होती. ३ एप्रिल १९७३ रोजी मोटोरोलाचे संशोधक आणि कार्यकारी मार्टिन कूप आणि बेल लॅब्जचे डॉ. जोएल एस. यांनी ग्राहकांच्या हॅंडहेल्ड उपकरणांतून पहिला मोबाईल टेलिफोन काॅल केला. मार्टिन कूपर (इन्व्हेन्टर) यांनी सेल्युलर मोबाईल फोनचा शोध लावला. हातातील मोबाईलचा पहिला फोन कॉल मार्टिन "मार्टी" कूपर यानी केला. ते एक अमेरिकन अभियंता होते.

मोबाइल वापराचे दुषपरिणाम :[संपादन]

१)गर्भवती महिलांसाठी आणि त्यांची मुले यांना विशिष्ट धोका असतो, म्हणूनच सेल फोनचा वापर कमी करण्याची त्यांना शिफारस केली जाते.

२)पुरुष प्रजनन संस्थेमध्ये फोनचे हानिकारक प्रभाव होतात म्हणून पुरुषांनी त्यांच्या पायघोळ्यांच्या खिशात फोन घेऊन जाऊ नये.

३)मोबाइल फोनवर मजकूर पाठवणे आणि विविध खेळ खेळणे डोळ्यांसाठी हानिकारक आहे.

४)विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि आक्रमकता येते .

५) डोकेदुखी, लक्ष कमी लागणे, स्वभाव चिडचिडेपणा होणे, झोपे कमी लागणे आणि नैराश्य इ. विकार होऊ शकतात.

मोबाईल फोनची उत्क्रांती

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: