ब्रेतॉन लोक
| फ्रान्स | ६०–७० लाख |
|---|---|
| ब्रतान्य | ३३,१८,९०४[१][note १] |
| लावार-अतलांतिक | १३,९४,९०९[२][note २] |
| इल-दा-फ्रान्स | १५,००,०००[३] |
| ला आव्र | ७०,०००[४] |
| कॅनडा(मुख्यतः क्वेबेक) | १७,४६५ [५] |
ब्रेतॉन (ब्रेतॉन: Breton किंवा Vretoned [६]) हे वायव्य फ्रान्समधील ब्रेतान्य येथील मूळचे केल्टी वांशिक गट आहेत. मुळात, हे नाव ब्रिटॉनिक भाषा बोलणाऱ्यांच्या गटांना सूचित करते, जे नैऋत्य ग्रेट ब्रिटनमधून, विशेषतः कॉर्नवॉल आणि डेव्हॉनमधून, मुख्यतः ब्रिटनच्या अँग्लो-सॅक्सन वसाहतीच्या काळात स्थलांतरित झाले. त्यांनी ३ऱ्या ते ९व्या शतकापर्यंत (सर्वात जास्त ४५० ते ६०० दरम्यान) आर्मोरिकाच्या पश्चिमेकडे लाटांच्या स्वरूपात स्थलांतरित झाले. त्यानंतर आर्मोरिकाच्या त्या पश्चिम भागाला आणि तेथील रहिवाशांना त्यांचे नाव देण्यात आले ('ब्रेतान्य'). [७]
ब्रेतान्याची पारंपरिक भाषा ब्रेतॉन भाषा ( Brezhoneg ) आहे, जी ब्रिटोनिक शाखेची एक केल्टी भाषा असून आता ती प्रामुख्याने निम्न ब्रेतान्यामध्ये (पश्चिम भागात) बोलली जाते. २०१३ च्या आकडेवारीनुसार, सु. २,०६,००० लोक ब्रेतॉन भाषा बोलतात. [८] ब्रेतान्यामधील दुसरी प्रमुख अल्पसंख्याक भाषा गायो आहे, जी एक रोमान्स भाषा आहे ; गायो फक्त उच्च ब्रेतान्यामध्ये बोलली जाते, जिथे पूर्वी ब्रेतॉन भाषा देखील बोलली जात असे, पण तिचा आज ऱ्हास झाला आहे आणि सु. इ. स. ९०० पासून उच्च ब्रेतान्यामध्ये तिचे वर्चस्व कमी झाले आहे. सध्या, बहुतेक ब्रेतॉन लोकांची मातृभाषा प्रमाण फ्रेंच आहे.
इतिहास
[संपादन]
उत्तर रोमन काळ
[संपादन]४थ्या शतकाच्या उत्तरार्धात, रोमन सैन्यातील मोठ्या प्रमाणात ब्रिटिश सहायक तुकड्या आर्मोरिकामध्ये तैनात केले गेले असू शकतात; आर्मोरिका म्हणजे आजचे ब्रेतान्य आणि नोर्मंदीचा बहुतेक भाग. ९व्या शतकातील हिस्तोरिया ब्रित्तोनुम या पुस्तकानुसार, सम्राट माग्नुस माक्सिमुस, ज्यांनी ब्रिटनमधून रोमन सैन्य मागे घेतले होते, त्यांनी आपले सैन्य आर्मोरिकामध्ये स्थायिक केले होते.
नेन्निउस आणि गिल्दास यांनी पुढील शतकात आक्रमण करणाऱ्या अँग्लो-सॅक्सन आणि स्कोतींपासून वाचण्यास आर्मोरिकामध्ये स्थायिक झालेल्या ब्रिटीशांच्या दुसऱ्या लाटेचा उल्लेख केला आहे. आधुनिक पुरातत्वशास्त्र देखील दोन-लाटांच्या स्थलांतराला दुजोरा देते. [९]
पूर्व मध्ययुग
[संपादन]पूर्व मध्ययुगात, ब्रेतान्य तीन राज्यांमध्ये विभागली गेली होती— दोम्नोने, कोर्नूएई (केर्नेव) आणि ब्रो वारोख ( ब्रेरेक )—जी कालांतराने ब्रेतान्याच्या डचीमध्ये विलीन झाली. पहिल्या दोन राज्यांची नावे ब्रिटनमधील स्थलांतरित जमातींच्या मूळ प्रदेशांवरून, कॉर्नवॉल (केर्नोव) आणि डेव्हॉन ( दुम्नोनिया ) यांवरून घेतली गेली असावीत. ब्रो वारोख (" वारोखचा प्रदेश", आज ब्रो ग्वेनेद ) हे नाव, व्हानेस (ग्वेनेद) प्रदेशावर वर्चस्व गाजवणाऱ्या, पहिल्या ज्ञात ब्रेतॉन शासकांपैकी एकाच्या नावावरून आले आहे. दोम्नोनेचे शासक, जसे की कोनोमोर, सर्व ब्रेतॉन लोकांवर आपले अधिपत्य असल्याचा दावा करत आपला प्रदेश वाढवत होते, जरी स्थानिक सरदारांमध्ये सतत तणाव होता. [ <span title="This claim needs references to reliable sources. (July 2009)">संदर्भ आवश्यक</span> ]
आधुनिक ब्रेतॉन ओळख
[संपादन]
संपूर्ण फ्रान्समध्ये बरेच लोक ब्रेतॉन वांशिकतेचा दावा करतात. मार्यों कॉतीयार, [१०] सुलेन ब्राहीम, [११] मालीक झिदी, [१२] पात्रीक प्वाव्र दार्वोर, यॉन गॉर्कुफ, नोल्वेन लेर्वा आणि यान त्येर्सेन यांसारख्या काही फ्रेंच सेलिब्रिटी असे दावा करतात. [१३]
संस्कृती
[संपादन]धर्म
[संपादन]ब्रेतॉन लोक मुख्यपणे कॅथलिक चर्चचे सदस्य आहेत, तर फ्रान्सच्या सुधारलेल्या चर्चचे आणि निधर्मी लोकांचे अल्पसंख्याक आहेत. ब्रेतान्य हा संपूर्ण फ्रान्समधील सर्वात कट्टर कॅथलिक प्रदेशांपैकी एक आहे. १९७० आणि १९८० च्या दशकात रविवारच्या प्रार्थनासाठीची उपस्थिती कमी झाली; तरीही, तीर्थयात्रांसारख्या इतर धार्मिक प्रथांचे पुनरुज्जीवन झाले आहे. यामध्ये त्रो ब्रेइस एक आहे, जो ब्रेतॉन ख्रिस्ती धर्माच्या सात संस्थापक संतांच्या देवस्थानांमध्ये आयोजित केला जातो. ही ख्रिस्ती परंपरा आस्तिक आणि नास्तिक दोघंही मोठ्या प्रमाणाने आदर करतात, जिला ब्रेतॉन वारसा आणि संस्कृतीचे प्रतीक मानतात.

ब्रेतॉन धार्मिक परंपरेत " सात संस्थापक संतांवर " खूप भर दिला जातो.
- लेओनचा पोल, सें-पोल-दे-लेओं (ब्रेतॉन: Kastell-Paol ) येथे,
- तुद्वाल ( सान्त तुद्वाल ), त्रेग्ये (ब्रेतॉन: Landreger ) येथे,
- ब्रिओक, सें-ब्रियूक (ब्रेतॉन: Sant-Brieg, गायो: Saent-Berioec ) येथे,
- मालो, सें-मालो (ब्रेतॉन: Sant-Maloù, गायो: Saent-Malô ) येथे,
- दोलचे सॅमसन, डोल-डे-ब्रेटाग्ने (ब्रेतॉन: Dol, गायो: Dóu ) येथे,
- पादार्न, व्हॅन (ब्रेतॉन: Gwened) येथे,
- कौरिन्तिन ( सान्त कौरिन्तिन ), क्विम्पर (ब्रेतॉन: Kemper) येथे.
भाषा
[संपादन]
ब्रेतॉन भाषेच्या चार मुख्य बोली आहेत: ग्वेनेदेग ( व्हान ), केर्नेव्हेग ( कॉर्न्वाय ), लिओनेग ( लेओं ) आणि त्रेगेर्येग ( त्रेगर ), ज्यांच्यामध्ये परस्पर सुगम्यतेची पातळी वेगवेगळी आहे. १९०८ मध्ये एक प्रमाणित लेखनपद्धती तयार केली गेली. चौथी बोली, ग्वेनेदेग, यात नव्हती, पण १९४१ च्या नंतरच्या लेखनपद्धतीच्या सुधारणेत तिचा समावेश केला गेला. [१४]
ब्रेतॉन पाककृती
[संपादन]
ब्रेतॉन खाद्यसंस्कृतीमध्ये व्यापक फ्रेंच पाककलेच्या परंपरेतील अनेक घटक आढळतात. काही स्थानिक वैशिष्ट्य:
- क्रांप्वें
- शूशेन – ब्रेतॉन मद्याचा एक प्रकार
- फार्ज फॉर्न ( फार ब्रेतॉन ) – सुक्या आलुबुखारासह बनवलेली एक गोड चरबीची खीर
- क्वीन-आमान – लोणीची पेस्ट्री
- क्रॅम्पुएझ ( क्रेप किंवा गालेत ) – गहू किंवा कुट्टूच्या पिठापासून बनवलेले पातळ पॅनकेक; सहसा मुख्य जेवण म्हणून खाल्ले जातात.
- लाम्बिग – सफरचंदाचे ओ द व्ही
- सिस्त्र – सायडर
- कारामेल ओ बोर साले - खारट लोणीचा कारमेल
ब्रेतान्याची प्रतीके
[संपादन]
ब्रेतान्याचे काही पारंपारिक ब्रेतॉन चिन्ह:

गॅलरी
[संपादन]- विल्यम-अडॉल्फ बोग्वेरो, ब्रेतॉन भाऊ आणि बहीण
- पॉल गॉग्विन, ब्रेतॉन गर्ल
- एमिल बर्नार्ड, ब्रेतॉन महिला एका भिंतीजवळ
- जीन-बॅप्टिस्ट-कॅमिल, ब्रेतॉन महिला आणि तिची लहान मुलगी
- फ्रेंच नौदलाच्या लॅन-बिहाऊचा बागड
- ब्रेतॉन पाईप वादक
- ↑ "Populations légales des régions en 2017". INSEE. 13 September 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Populations légales des départements en 2017". INSEE. 13 September 2020 रोजी पाहिले.
- ↑ Rolland, Michel. "La Bretagne à Paris". 2016-11-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 December 2016 रोजी पाहिले.
- ↑ "Ils sont 70 000 ! Notre dossier sur les Bretons du Havre". 20 December 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 December 2016 रोजी पाहिले.
- ↑ "Canada Census Profile 2021". Census Profile, 2021 Census. Statistics Canada Statistique Canada. 7 May 2021. 3 January 2023 रोजी पाहिले.
- ↑ निश्चित उपपदानंतर, B > V
- ↑ Koch, John (2005). Celtic Culture: A Historical Encyclopedia. ABL-CIO. p. 275. ISBN 978-1-85109-440-0. September 29, 2012 रोजी पाहिले.
- ↑ "Breton". Ethnologue. 2017-06-09 रोजी पाहिले.
- ↑ Léon Fleuriot, Les origines de la Bretagne: l’émigration, Paris, Payot, 1980.
- ↑ "Marion Cotillard: 'Before my family, everything was dedicated to the character'". The Guardian. August 2, 2014.
- ↑ "Suliane Brahim, le Grand Jeu". Libération. February 28, 2018. 2019-09-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2026-07-22 रोजी पाहिले.
- ↑ ifrance.com Archived 2008-08-27 at the वेबॅक मशीन.
- ↑ "Yann Tiersen: ∞ (Infinity) & the Origin of Its Language". 31 December 2016 रोजी पाहिले.
- ↑ "Breton language, alphabet and pronunciation". 31 December 2016 रोजी पाहिले.
- ↑ Legal population of the administrative region of Brittany in 2017
- ↑ Legal population of Loire-Atlantique in 2017
<ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="note"/> खूण मिळाली नाही.