ब्रूकलिन ब्रिज
Jump to navigation
Jump to search
ब्रूकलिन ब्रिज (Brooklyn Bridge) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामधील एक पूल आहे. १८८३ साली ईस्ट रिव्हरवर बांधला गेलेला व न्यू यॉर्कच्या मॅनहॅटन व ब्रूकलिन ह्या बरोंना जोडणारा ब्रूकलिन ब्रिज हा अमेरिकेमधील सर्वात जुन्या व सर्वात प्रसिद्ध पुलांपैकी एक आहे.
या पूलाचा मूळ आराखडा जॉन ऑगस्टस रोबलिंगने तयार केला होता. बांधकाम सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा वॉशिंग्टन रोबलिंगने हा पूल बांधून पूर्ण केला.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत