ब्रिजिट बार्दो
ब्रिजिट बार्दो | |
---|---|
![]() बार्दो, १९६५ | |
जन्म | २८ सप्टेंबर १९३४ पॅरिस, फ्रान्स |
ब्रिजिट ॲन-मेरी बार्दो (जन्म २८ सप्टेंबर १९३४) ही भूतपूर्व फ्रेंच फॅशन मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि प्राणिहक्क कार्यकर्ती आहे. ती १९६० च्या दशकातील विख्यात प्रणय प्रतीकांपैकी एक होती.
आरंभीच्या काळात बॅले नृत्यात रस असलेल्या ब्रिजिटने १९५२ मध्ये अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली. सोळा चित्रपटांमधील भूमिकांनंतर रॉजर वॅदिम या तिच्या तत्कालीन पतीच्या अँड गॉड क्रिएटेड वुमन या वादग्रस्त चित्रपटातील भूमिकेमुळे ब्रिजिट जगविख्यात झाली. या आणि नंतरच्या काही भूमिकांमुळे फ्रेंच बुद्धिवाद्यांचे तिच्याकडे लक्ष गेले. विख्यात लेखिका सिमॉन द बोव्हारच्या १९५९ मधील द लोलिता सिंड्रोम नावाच्या निबंधाचा ब्रिजिट वस्तूविषय होती.
सन १९७३ मध्ये मनोरंजन जगतातून ब्रिजिटने निवृत्ती घेतली. आपल्या कारकिर्दीत तिने ४७ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. निवृत्तीनंतर ती प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती बनली. १९९० च्या दशकात आप्रवासन, इस्लामीकरण, फ्रान्समधील इस्लाम धर्म यांच्यावर टीका केल्याने ती वादग्रस्त ठरली.
बाह्यदुवे[संपादन]
इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील ब्रिजिट बार्दो चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |