ब्रामिनी वाळा साप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ब्रामिनी वाळा साप हा एक छोट्या आकाराचा साप आहे.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.  • मराठी नावे-कानेरा साप, कडू साप, दानव साप, आंधळा साप,सोमनाथ, टिल्यो(गोवा). इंग्रजी नाव-Worm Snake, शास्त्रीय नाव-Ramphotyphlops braminus
  • हा साप लांबून गांडूळासारखा दिसतो. व्यवस्थित पाहिले असता त्याच्या शरीरावरील खवले दिसतात.शरीराभोवती २० खवले असतात. याचा रंग काळपट चॉकलेटी असून शरीर गुळगुळीत व चकचकीत
असते. डोळे बारीक काळ्या  
ठिपक्याप्रमाणे असतात. शेपटी अंती टोकदार असते.हा साप पाणथळ ठिकाणावर,मऊ जमिनीत,वाळलेल्या पालापाचोळ्यात किंवा दगडाखाली,घरातील मोरी,बाथरुममध्ये देखील आढळतो.हात लावण्याचा 
प्रयत्न केला असता जलद गतीने वळवळ करतो व कधीकधी घाबरून मल बाहेर टाकतो.
  • सरासरी लांबी-१२.५सें.मी.(५इंच). अधिकतम लांबी-२३सें.मी.(९इंच)
  • प्रजनन-मादी तांदळाच्या आकाराची ३ते७अंडी घालते.
  • आढळ- भारतात सर्वत्र
  • वैशिष्ट्ये- हे साप जमिनीखाली बीळ करून राहण्यात फार कुशल असतात.ते अत्यंत संवेदनशील असतात.त्यांना थोडीशी जरी चाहूल लागली तरी ते आपल्या अंगाचे आकुंचन करतात. त्यांच्या ह्या
संवदेनक्षमतेचे शास्त्रज्ञांना अत्यंत आश्चर्य वाटत आले आहे.पावसाने मऊ झालेली जमीन उकरण्यासाठी डोक्याचा वापर करतात. हा फक्त पावसाळ्यात जमिनीवर दिसतो. इतरवेळी जमिनीखाली दीर्घनिद्रा 
घेतो.

[१]

  1. ^ १साप, लेखक-निलीमकुमार खैरे २सर्प,पृथ्वीतलावरील आश्चर्य ले.-अमित सय्यद ३आपल्या भारतातील साप-अनु.मारुती चितमपल्ली