ब्रम्हपुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रम्हपूरी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
  ?ब्रम्हपुरी
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —

२०° २१′ ३६″ N, ७९° ३०′ ३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ २१.९२ चौ. किमी
जवळचे शहर नागपूर
प्रांत विदर्भ
विभाग नागपूर
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ गडचिरोली-चिमूर (लोकसभा मतदारसंघ)
तहसील ब्रम्हपुरी
पंचायत समिती ब्रम्हपुरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४१२०६
• +०७१७७
• +३४


ब्रम्हपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक अतिमहत्त्वाचे शहर आहे

इतिहास[संपादन]

ब्रम्हपुरी नगरपरिषदेची ब्रिटिशकालीन इमारात

ब्रम्हपुरी चे आमदार विजय वडेट्टीवार

१८५४ मध्ये जेव्हा स्वतंत्र चांदा (सध्याचे चंद्रपूर ) जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली तेव्हा १८७४ मध्ये ब्रम्हपुरी तालुक्याची तालुक्याची निर्मीती करण्यात आली. सुरुवातीला चांदा जिल्ह्यामध्ये केवळ वरोरा, मूल, ब्रम्हपुरी आणि चांदा तालुक्यांचाच समावेश होता. त्यानंतर १९०५ मध्ये चांदा आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील जमीनदारी मालमत्ता हस्तांतरीत करुन गडचिरोली या नव्या तालुक्याची निर्मीती करण्यात आली. शहरामध्ये इंग्रजांच्या काळातील टेनीस क्लब आहे. तसेच ब्रिटीश काळातील अनेक वास्तु शहराच्या पारतंत्र्यापुर्वी असणाऱ्या अस्तीत्वाची जाणीव करुन देत मोठ्या थाटात उभ्या आहेत. इंग्रजाच्या काळापासुन अस्तित्वात असलेल्या या शहराच्या चारही बाजुंनी १०० कि.मी. पर्यंत कोणतेही मोठे शहर नाही. गेल्या अनेक दशकांपासुन चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्ह्याचे विभाजन करुन नव्या ब्रम्हपुरी जिल्ह्याची निर्मीती जिल्ह्याची निर्मीती करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. परंतु शहराकडे सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याने वेळोवेळी इथल्या नागरीकांचा अपेक्षाभंग होऊन शहरावर आणि तालुक्यावर नेहमीच अन्याय होत असतो.

१९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करुन नव्या ब्रम्हपुरी जिल्ह्याच्या निर्मीतीची घोषणा करण्यात आली होती. परंतु राजकीय दबावामुळे असो वा प्रशासकीय सोयीसाठी एका रात्रीतुनच निर्णय बदलविला गेला आणि ब्रम्हपुरी ऐवजी गडचिरोली या नव्या जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली.

ब्रम्हपुरी तालुक्याचे अनेक वेळा विभाजन करण्यात आले. त्यामध्ये नव्या गडचिरोली तालुक्याची स्थापना, नव्या सिंदेवाही - सावली - नागभीड तालुक्याची स्थापना. ब्रम्हपुरी हे चंद्रपुर जिल्ह्याचे प्रशासकीय उपविभाग आहे ज्यामध्ये पुर्वी नागभीड, सिंदेवाही आणि सावली आणि ब्रम्हपुरी तालुक्यांचा समावेश असायचा परंतु आता केवळ नागभीड आणि ब्रम्हपुरी तालुक्यांचा समावेश असतो.

भूगोल व हवामान[संपादन]

ब्रम्हपुरी शहर समुद्रसपाटीपासून २३० मीटर उंचीवर आहे. शहराचे हवामान सामान्यतः उष्ण व कोरडे आहे. उन्हाळ्यामध्ये तापमानाचा पारा ४७°C पर्यंत जातो तर हिवाळ्यामध्ये ७°C पर्यंत खाली घसरतो.

ब्रम्हपुरी शहरामध्ये पर्जन्याचे प्रमाण खूप आहे, एका दिवसात २०२ मिलिमीटर पर्जन्याचा विक्रम १३ जुलै २०१३ मध्ये नोंदविण्यात आला, यापूर्वी २४ तासातील केवळ १३१ मिलिमीटर पावसामुळे संपूर्ण चंद्रपूर शहर पाण्याखाली आले होते, तेव्हा ३०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडूनही ब्रम्हपुरी शहरामध्ये पुराची स्थिती निर्माण झाली नाही, इथे कितीही पाऊस पडला तरी ब्रम्हपुरीत पूरस्थिती उद्भवत नाही हे ब्रम्हपुरी शहराचे वैशिष्ट्य आहे.

ब्रम्हपुरी शहर चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असून जिल्ह्यात अतिशय शांत शहर म्हणून ओळख असलेले हे शहर, जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर वसले आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे, परिसरात शिक्षणाचे माहेरघर अशी ब्रम्हपुरी शहराची ओळख आहे शिवाय वैद्यकीय सेवेसाठी शहराचा परिसरामध्ये लौकिक आहे. शहराच्या वाढत्या विकासामुळे परिसरातील लोक शहराच्या प्रेमात पडून येथेच वस्ती करुन राहतात त्यामुळे शहराची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे.

लोकसंख्या[संपादन]

2001 नूसार 31,207 इतकी आहे

शिक्षण[संपादन]

,Brahmpuri shaharala शिक्षणाचे माहेरघर मनले जाते

पर्यटन[संपादन]

धम्मभूमी मधील गौतम बुद्धाची निद्रिस्त मुर्ती

पर्यटनाच्या बाबतीत हा परिसर मागासलेला असला तरी गेल्या काही वर्षातील घडामोडी लक्षात घेता महाराष्ट्र शासन सुद्धा या भागामध्ये पर्यटनाचा विकास करण्यात उत्सुक आहे असे दिसते. ब्रम्हपुरी शहराच्या वायव्य सीमेवर वसलेल्या धम्म प्रचार केंद्र, धम्मभूमी नामक संस्थेला महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. त्या क्षेत्राचा विकासही पर्यटन स्थळ म्हणुन होताना दिसत आहे. धम्मभूमी परिसर उपवन संरक्षक, वनविभाग ब्रम्हपुरी यांच्या शासकिय बंगल्याच्या मागे शिवाजी नगर मार्गावर आहे. याशिवाय शहरामध्ये तीन तलाव आहेत. त्या तीन तलावांच्या सौंदर्यीकरणाचे काम नगर परीषद ब्रम्हपूरी ने पुर्ण केल्यास ते सुद्धा पर्यटन स्थळ म्हणुन उदयास येतील. ब्रम्हपूरी नगर परीषद क्षेत्रामध्ये दाट वस्ती असल्यामुळे शहरात एकही मोकळे मैदान नाही जिथे उद्यानांची निर्मिती केली जाऊ शकेल.

उत्सव[संपादन]

हिंदू, बौद्ध व इस्लाम हे शहरातील लोकांचे प्रमुख धर्म आहेत. तसे असले तरी या शांतताप्रिय शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोवींदाने एकमेकांच्या सण - उत्सवांमध्ये सहभागी होत असतात.

गणपती उत्सव[संपादन]

ब्रम्हपुरी मध्ये गणेश उत्सव खुप उत्साहाने साजरा केला जातो, या गणपती उत्सवाला "ब्रम्हपुरी चा राजा" असे म्हणतात. गणेश उत्सव हा ब्रम्हपुरी कराणांसाठी खूप मनोरंजनाचा आणि उत्साहाचा असतो, या उत्सवामध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक असतात. ब्रम्हपुरी सभोवतातील संपूर्ण गावाजवळील आणि सभोवतालील नागरिक हा गणेशोत्सव बघायला येतात.

बौद्ध सण व उत्सव[संपादन]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व समता सैनिक दल, ब्रम्हपूरी यांच्या विद्यमाने भीमा कोरेगाव शौर्य दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन वर्धापन सोहळा या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तर धम्म प्रचार केंद्र, धम्मभूमी, ब्रम्हपूरी द्वारे धम्म कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य रात्री शहरातील प्रत्येक भागातुन रात्री भव्य फेऱ्या काढल्या जातात, व भिमनगर ब्रम्हपूरी येथील डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याची वंदना करुन परत जातात. तर गेल्या काही वर्षांपासुन २४ तास अभ्यास स्पर्धेचे आयोजन केले जाते..

ख्रिस्ती सण व उत्सव[संपादन]

शहरातील लोकांना ख्रिस्ती सणांचे कायम आकर्षण राहिले आहे. शहरामध्ये ख्रिस्ती लोकसंख्या अतिशय विरळ असली तरी नाताळाच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तांचे दर्शन घेण्यासाठी चर्च मध्ये खुप गर्दी असते. ख्रिस्तानंद एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित ख्रिस्तानंद कॉन्व्हेंट स्कूल आणि ख्रिस्तानंद रूग्णालयात ख्रिस्त जन्मानिमित्य भरलेल्या प्रदर्शनीत बघ्यांची गर्दी असते.

हिंदु सण व उत्सव[संपादन]

संपूर्ण ब्रम्हपुरीकरांचा प्रमुख उत्सव म्हणजे गणेशोत्सव. सर्व ब्रम्हपुरीकर गणेशोत्सवाची वर्षभर वाट बघत असतात. माजी आमदार बाबासाहेब खानोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ तर माजी नगराध्यक्ष अशोक भैय्या यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला ने. हि. गणेशोत्सव मंडळ हे दोन प्रमुख गणेशोत्सव मंडळ आहेत.

शहराबद्दल[संपादन]

ब्रम्हपुरीचे लाडके आमदार विजय वडेट्टीवार. ब्रम्हपुरीचे नगराध्यक्ष रिताताई ऊराडे. ब्रम्हपुरी शहर क्रांग्रेस चा माहेरघर आहे. मि, आकाश टिकले ब्रम्हपुरी.

संदर्भ[संपादन]

http://timesofindia.com/city/nagpur/Record-rainfall-in-Bramhapuri/articleshow/21063111.cms


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके
चंद्रपूर | वरोरा | भद्रावती | चिमूर | नागभीड | ब्रम्हपूरी | सिंदेवाही | मूल | गोंडपिंपरी | पोंभुर्णा | सावली | राजुरा | कोरपना | जिवती | बल्लारपूर