Jump to content

हिंदू धर्मामधील गौतम बुद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बौद्धावतार या पानावरून पुनर्निर्देशित)

काही हिंदू अनुयायी गौतम बुद्धांना विष्णुचा नववा अवतार आहे. तसेच काही हिंदू जणांच्या मते, हा (बुद्ध) विरोधी अवतार असून सनातन वैदिक धर्माच्या विसंगत अशी शिकवण या अवताराद्वारे करण्यात आली. मात्र याचा मूळ हेतू हा अनाधिकारांच्या हाती गेलेला वैदिक धर्म त्यांच्यापासून निराळा करणे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र शाखा प्रस्थापित करणे, हा होता. इतर जणांच्या मते, गौतम बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार नसून कलियुगात संतांच्या माध्यमातून वेळोवेळी होत असलेली धर्मसंस्थापना हाच विष्णूचा अवतार आहे. त्यांच्या मते, कलियुगात सर्व सामान्यांची बुद्धी सनातन वैदिक धर्मापासून भ्रष्ट झालेली आहे. ती सन्मार्गाला लावून कलियुगातील आर्त, दुःखी जीवांना साधनेच्या मार्गाला लावणे, त्यांना मुमुक्षू, नंतर साधक व शेवटी मोक्षास नेणे, हे संतांचे कार्य आहे. यात समाजात वेळोवेळी होणारे रज-तमाचे प्रदूषण दूर करणे, हा या अवताराचा क्षात्रधर्म आहे. हे कार्य संतांच्या हातूनच होईल आणि हाच बौद्धावतार असेल.[ संदर्भ हवा ]

श्रीमद्भागवत्महापुराणामते गौतम बौद्धच हे भगवान विष्णूचे नववे बौद्धावतार होते आणि ते महात्मा गौतम बुद्ध भारतात होऊन गेले. त्यान्चा जन्म हा कीकट क्षेत्रात म्हणजेच बोधगया येथे झाला, कारण श्रीमद्भागवत्महापुराणात "बुद्धो नामाम्जनसुतः कीकटेशु भविष्यति" असा श्लोक आहे. यज्ञात धार्मिक गैरसमजुतीतून होणाऱ्या पशुहत्येस ह्यानी विरोध केला होता.

बौद्ध अनुयायांच्या मते, हा हिंदू धर्मातील बुद्धावतार हा बौद्ध तत्त्वज्ञानाला धरून नाही व बौद्ध धर्माशी सुसंगतही नाही. चवथ्या शतकात वैदिक धर्मियांनी बौद्ध आणि शैवांना शह देण्यासाठी एक जबरदस्त युक्ती शोधली. त्यांनी ऋग्वेदातील एक दुय्यम देवता शोधून काढली. त्या देवतेचे नाव विष्णू. त्यांनी अवैदिक वासुदेवभक्तिच्या पांचरात्र संप्रदायातून भक्तिची संकल्पना उचलली. कृष्ण, रामादी अवैदिक देवतांना विष्णूचे अवतार बनवून टाकलेच, पण गौतम बुद्धालाही नववा अवतार बनवून टाकले. बौद्ध धर्मातील मांसाहार-निषेध, अहिंसादी तत्त्वे उचलली गेली. ‘हर’ या पुरातन शिववाचक शब्दाला गाडण्यासाठी ‘हरी’ हा नवाच शब्द शोधला गेला. तसेच गौतम बुद्ध अवतार नसण्याचे कारण म्हणजे त्याची अवैदिक शिकवण सर्व अवतार हे वेदसंस्कृतीला धरून कार्य करणारे होते, तर बुद्ध हा आचार धर्माला मानणारा होता. आचार धर्माला आत्म्याचे अधिष्ठान लागत नाही. 'आत्म्याचे अस्तित्त्व मानणे हे सर्व अनर्थांचे मूळ आहे’, अशी त्याची धारणा असल्याने तो ईश्वर या संकल्पनेच्या विरुद्ध होता. याला अनीश्वरवादी प्रवृत्ती, असे म्हणतात.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]