बोलपूर लोकसभा मतदारसंघ
Appearance
(बोलपूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
बोलपूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील बोलपूर परिसरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ बीरभूम जिल्ह्यामध्ये तर उर्वरित तीन पूर्व बर्धमान जिल्ह्यात आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहे.
१९७१ ते २०१४ दरम्यान तब्बल ४३ वर्षे येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ह्या डाव्या पक्षाचे संपूर्ण वर्चस्व होते. लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी येथून ७ वेळा निवडून आले होते.
विधानसभा मतदासंघ
[संपादन]लोकसभा मतदारसंघ क्र. ४१ - बोलपूर मध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.
| # | नाव | जिल्हा |
|---|---|---|
| १ | केतुग्राम | पूर्व बर्धमान |
| २ | मंगलकोट | |
| ३ | आऊसग्राम | |
| ४ | बोलपूर | बीरभूम |
| ५ | नानूर | |
| ६ | लावपूर | |
| ७ | मयुरेश्वर |
खासदार
[संपादन]| वर्ष | खासदार | पक्ष | |
|---|---|---|---|
| २०१४ | अनुपम हाजरा | तृणमूल काँग्रेस | |
| २०१९ | असित कुमार माल | ||
| २०२४ | |||