बॉर्न (चित्रपट शृंखला)
Appearance
बॉर्न चित्रपट शृंखला ही प्रसिद्ध हॉलिवूड ऍक्शन थरार चित्रपटांची शृंखला आहे. या शृंखलेत आजवर ३ चित्रपट प्रदर्शित झाले असून मॅट डेमन याची प्रमुख भूमिका आहे. अमेरिकेतील गुप्तहेर खात्यात काम करणारा जेसन बॉर्न (मॅट डेमन) एका कामगिरीवर असताना आपली स्मृती गमावून बसतो. अतिशय चाणाक्ष हा अधिकारी आपली ओळख काय आहे याचा प्रयत्न सूरू करतो व गुप्तहेर खात्याला कळते हा आपल्यासाठी धोकादायक बनलेला आहे कारण या प्रयत्नात गुप्तहेर खात्याची अनेक षडयंत्रे उघडीस येऊ शकत असतात. मग जेसन बॉर्नला संपवणे हे गुप्तहेर खात्याचे उदीष्ट बनते व दोघात संघर्ष चालू होतो. तीन भागांच्या शृंखलेत तो अनेक षडयंत्रे उघडकीस आणतो व सरतेशेवटी आपली ओळख पुन्हा मिळवतो.