Jump to content

बैराग (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बैराग (चित्रपट)
चलचित्र
प्रकाशन तारीख1976 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकअसित सेन (दिग्दर्शक) संपादन
पटकथाअबरार अल्वी संपादन
प्रमुख कलाकारदिलीप कुमार, सायरा बानो, Ruma Guha Thakurta, लीना चंदावरकर संपादन
चित्रीकरण दिग्दर्शककमल बोस संपादन
संगीतकारकल्याणजी-आनंदजी संपादन

बैराग हा १९७६ चा हिंदी भाषेतील चित्रपट आहे. मुशीर-रियाझ या जोडीने निर्मित केलेला हा चित्रपट असित सेन यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात दिलीप कुमारांची मुख्य भूमिका आहे, ज्यांना तिहेरी भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी फिल्मफेर नामांकन मिळाले होते. बैरागमध्ये सायरा बानू, लीना चंदावरकर, रूमा गुहा ठाकुरता, प्रेम चोप्रा, हेलेन, सुजित कुमार, मदन पुरी, पेंटल, कादर खान, असित सेन आणि सचिन पिळगांवकर यांच्या इतर भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत कल्याणजी-आनंदजी या जोडीचे आहे, ज्यांना सर्वोत्कृष्ट संगीतासाठी फिल्मफेर नामांकन मिळाले होते. या चित्रपटाला पी. हरिकिशन यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट ध्वनीसाठी फिल्मफेर पुरस्कार मिळाला. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही.[][] ही दिलीप कुमार यांची बॉक्स ऑफिसवर सलग तिसरा अपयशी चित्रपट ठरला.[] या चित्रपटानंतर, ते काही काळासाठी कामापासून दूर झाले आणि क्रांती (१९८१) मध्ये ४ वर्षांनी परतले.[]

संगीत

[संपादन]

चित्रपटाचे संगीत हे कल्याणजी-आनंदजी यांनी दिले होते आणि गीते आनंद बक्षी यांनी लिहिली होती.

गाणे गायक
"ओ शंकर मेरे" - १ महेंद्र कपूर
"ओ शंकर मेरे" - २ महेंद्र कपूर
"छोटी सी उमर में ही लग गया रोग" लता मंगेशकर
"मैं बैरागी नाचूं गाऊं" मोहम्मद रफी, लता मंगेशकर
"सारे शहर में आप सा कोई नहीं" मोहम्मद रफी, आशा भोसले
"पीते पीते कभी यूं जाम बदल जाते है" मोहम्मद रफी, आशा भोसले

पुरस्कार

[संपादन]
२४ वे फिल्मफेर पुरस्कार[] -

जिंकले

  • सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन - पी. हरिकिशन

नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. "Box Office 1976". boxofficeindia.com. 22 September 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. Malhotra, Aps (2015-09-24). "Bairaag (1976)". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2022-09-16 रोजी पाहिले.
  3. "Dilip Kumar Filmography, Movies List, Box Office Collection with HIT or Flop Verdict - Boxofficeindia, Box Office India, Box Office Collection, Bollywood Box Office, Bollywood Box Office". www.addatoday.com. 2021-10-19 रोजी पाहिले.
  4. Bhattacharya, Roshmila (February 8, 2018). "This Week That Year: Whipping up a revolution with Manoj Kumar's Kranti". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 2021-10-19 रोजी पाहिले.
  5. "Filmfare Nominees and [[:साचा:Sic]]" (PDF). The Times Group. 16 September 2022 रोजी पाहिले Internet Archive द्वारे. URL–wikilink conflict (सहाय्य)