Jump to content

सॅन फ्रान्सिस्को बे एरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बे एरिया या पानावरून पुनर्निर्देशित)

सान फ्रान्सिस्को बे एरिया तथा बे एरिया हा उत्तर कॅलिफोर्नियामधील सान फ्रान्सिस्को, सान पाब्लो आणि सुईसन खाड्यांच्या भोवतालचा प्रदेश आहे. यात अलामीडा, कॉन्ट्रा कोस्टा, मरिन, नापा, सान मटेओ, सांता क्लारा, सोलानो, सोनोमा, आणि सॅन फ्रान्सिस्को या काउंट्यांचा समावेश होते. क्वचित या प्रदेशात सांताक्रुझ आणि सान बेनितो काउंट्या व आसपासच्या प्रदेशाचाही समावेश केला जातो तसेच सान होआकिन, मर्सेड आणि स्टानिस्लॉस काउंट्यांमधील काही प्रदेशही यात गणला जातो. [१]

या प्रदेशात अंदाजे ७७.५ लाख लोक राहतात. १४ काउंट्यांमध्ये विस्तारलेले[१] बे एरिया महानगर क्षेत्र कॅलिफोर्नियामधील दुसऱ्या क्रमांकाचे (लॉस एंजेलस महानगरक्षेत्रामागे) तर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे नागरी क्षेत्र आहे. जगात हे ४१व्या क्रमांकावर आहे.[२] बे एरियाची लोकवस्ती वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे: या प्रदेशातील अंदाजे निम्मे रहिवासी हिस्पॅनिक, आशियाई, आफ्रिकन अमेरिकन किंवा पॅसिफिक आयलँडर आहेत. यांत मूळचे भारतीय असलेल्या लोकांची वस्ती उल्लेखनीय आहे.

प्रदेश[संपादन]

A map demarcating the boundaries of the nine-county Bay Area and the five subregions within.
पाच भाग दाखविणारा बे एरियाचा नकाशा.
सान होजे-सान फ्रान्सिस्को-ओकलंड नागरी क्षेत्र [३] मधील काउंटी
काउंटी २०२० लोकसंख्या २०१० लोकसंख्या बदल २०२० वस्तीघनता (प्रति मैल) नगरक्षेत्र
अलामीडा १६,८२,३५३ १५,१०,२७१ +११.४% २,२८१.३ सान फ्रान्सिस्को-ओकलंड-बर्कली
कॉन्ट्रा कोस्टा ११,६५,९२७ १०,४९,०२५ +११.१% १,६२६.३
मरिन २,५०,६६६ २,५२,४०९ +३.९% ५०४.१
सान फ्रान्सिस्को ८,७३,९६५ ८,०५,२३५ +८.५% १८,६२९.१
सान मटेओ ७,६४,४४२ ७,१८,४५१ +६.४% १,७०४.०
सान बेनितो ६४,२०९ ५५,२६९ +१६.२% ४६.२ सान होजे-सनिव्हेल-सांता क्लारा
सांता क्लारा १९,३६,२५९ १७,८१,६४२ +८.७% १,४९९.७
नापा १,३८,०१९ १,३६,४८४ +१.१% १८४.४ नापा
सोलानो ४,५३,४९१ ४,१३,३४४ +९.७% ५५१.८ वल्लेहो-फेरफील्ड
सोनोमा ४,८८,८६३ ४,८३,८७८ +१.०% ३१०.३ सांता रोसा-पेटालुमा
मर्सेड २,८१,२०२ २,५५,७९३</img> +९.९% १४५.१ मर्सेड
सांताक्रुझ २,७०,८६१ २,६२,३८२ +३.२% ६०८.५ सांताक्रुझ-वॉटसनव्हिल
सान होआकिन ७,७९,२३३ ६,८५,३०६ +१३.७% ५५९.६ स्टॉकटन-लोडी
स्टानिस्लॉस ५,५२,८७८ ५,१४,४५३</img> +७.५% ३६९.६ मोडेस्टो
मध्यवर्ती बे एरियातील काउंटी लाल रंगात आहेत</img> मर्सिड आणि स्टॅनिस्लॉस काउंटी 2018 पर्यंत CSAचे भाग नव्हते. [४] [५]

शहरे[संपादन]

बे एरियामध्ये सान फ्रान्सिस्को, सान होजे, ओकलंड सह अनेक मोठी शहरे आणि २५पेक्षा अधिक छोटी शहरे आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b Office of Management and Budget (September 14, 2018). "OMB Bulletin 18-04" (PDF). April 25, 2019 रोजी पाहिले.
  2. ^ Demographia (April 2016). Demographia World Urban Areas (PDF) (12th ed.). Archived from the original (PDF) on February 7, 2020. November 17, 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "2020 Population and Housing State Data". Unknown parameter |प= ignored (सहाय्य)
  4. ^ "OMB BULLETIN NO. 18-04" (PDF). September 14, 2018.
  5. ^ "OMB BULLETIN NO. 18-03" (PDF). April 10, 2018.