बेरिंग सामुद्रधुनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेरिंग सामुदधुनीचे उपग्रहाने टिपलेले चित्र

बेरिंगची सामुद्रधुनी (इंग्लिश: Bering Strait; रशियन: Берингов пролив) ही रशियाच्या चुकोत्का स्वायत्त ऑक्रूगला अमेरिकेच्या अलास्का राज्यापासून वेगळी करणारी एक सामुद्रधुनी आहे. सुमारे ८५ किमी रूंद असलेल्या बेरिंग सामुद्रधुनीच्या उत्तरेला आर्क्टिक महासागराचा चुक्ची समुद्र तर दक्षिणेला प्रशांत महासागराचा बेरिंग समुद्र आहे.