Jump to content

बुकोव्हिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुकोव्हिना हा मध्य युरोपातील एक भाग आहे. कार्पेथियन पर्वतरांगेच्या पूर्वेस असलेला हा प्रदेश सध्याच्या रोमेनिया आणि युक्रेन देशांत मोडतो. १९४०मध्ये या प्रदेशाचा उत्तर भाग सोवियेत संघाने बळकावला होता. याआधी तो रोमेनिया, ऑस्ट्रियाचे साम्राज्य आणि हाब्सबर्ग साम्राज्याचा भाग होता.