Jump to content

बी. सरोजा देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
B. Saroja Devi; બી. સરોજા દેવી; بی سروجا دیوی; B. Saroja Devi; B. Saroja Devi; B. Saroja Devi; B. Saroja Devi; B. Saroja Devi; بی سروجا دیوی; B. Saroja Devi; B. Saroja Devi; B. Saroja Devi; B. Saroja Devi; बी सरोजा देवी; బి. సరోజా దేవి; B. Saroja Devi; বি. সৰোজা দেৱী; B. Saroja Devi; சரோஜாதேவி; बी॰ सरोजा देवी; বি. সরোজা দেবী; B. Saroja Devi; B. Saroja Devi; बंगलोर सरोजा देवी; ବି ସରୋଜା ଦେବୀ; ബി. സരോജാ ദേവി; B. Saroja Devi; B. Saroja Devi; B. Saroja Devi; B・サロージャ・デヴィ; ಬಿ. ಸರೋಜಾದೇವಿ; B. Saroja Devi; B. Saroja Devi; B. Saroja Devi; B. Saroja Devi; B. Saroja Devi; B. Saroja Devi; B. Saroja Devi; ಬಿ. ಸರೋಜಾದೇವಿ; بى. ساروچا ديڤى; B. Saroja Devi; ਬੀ. ਸਰੋਜਾ ਦੇਵੀ; ᱵᱮᱝᱜᱟᱞᱩᱨᱩ ᱥᱚᱨᱳᱡᱟ ᱫᱮᱵᱤ; بی سروجا دیوی; actriz india; ભારતીય અભિનેત્રી; aktore indiarra; ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ; actriz india; индийская актриса; indische Schauspielerin; ban-aisteoir Indiach; بازیگر هندی; 印度女演員; indisk skuespiller; actriță indiană; بھارتی فلمی اداکارہ; indisk skådespelare; שחקנית הודית; onye na-eme ihe nkiri si India; भारतीय अभिनेत्री; సినీ నటి; ਭਾਰਤੀ ਅਦਾਕਾਰਾ; Indian actress; இந்தியத் திரைப்பட நடிகை; attrice indiana; ভারতীয় অভিনেত্রী; actrice indienne; indijska glumica; އިންޑިއާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް; Indian actress; ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ; Indian actress; ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി; actriu índia; India näitleja; pemeran asal India; indisk skodespelar; indisk skuespiller; Indiaas actrice; Indian actress; індійська акторка; ಭಾರತೀಯ ನಟಿ; actriz indiana; actriz india; ممثلة هندية; actores a aned yn 1938; intialainen näyttelijä; బి.సరోజాదేవి; బి. సరోజాదేవి; ಬಿ. ಸರೋಜ ದೇವಿ; ಬಿ.ಸರೋಜದೇವಿ; சரோஜா தேவி
बंगलोर सरोजा देवी 
Indian actress
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखजानेवारी ७, इ.स. १९३८
बंगळूर
मृत्यू तारीखजुलै १४, इ.स. २०२५
बंगळूर
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९५४
कार्य कालावधी (अंत)
  • इ.स. २०२५
नागरिकत्व
व्यवसाय
मातृभाषा
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q3521068
एमबीए ओळखण: 19cbc860-530e-4ac7-92a0-ca23e5e2c196
आय.एम.डी.बी. दुवा: nm0044600
विकिडाटावर माहिती संपादित करा

बंगलोर सरोजा देवी (७ जानेवारी, १९३८ - १४ जुलै, २०२५) या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. देवी यांनी सात दशकांहून अधिक काळ २०० तमिळ, कन्नड, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. त्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होत्या.

वयाच्या १७ व्या वर्षी, सरोजा देवी यांना महाकवी कालिदास (१९५५) या कन्नड चित्रपटातून पहिला मोठा ब्रेक मिळाला. तेलुगू चित्रपटसृष्टीत त्यांनी पांडुरंग महात्यम (१९५७) या चित्रपटातून पदार्पण केले आणि १९७० च्या दशकाच्या अखेरीपर्यंत अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या नादोदी मन्नन या तमिळ चित्रपटाने त्यांना तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक बनवले. १९६७ मध्ये लग्न झाल्यानंतरही, त्यांनी चित्रपटात काम करणे सुरू ठेवले. त्यांनी १९७४ पर्यंत तमिळ चित्रपटांमध्ये आणि १९८० पर्यंत तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय त्यांनी १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत हिंदी चित्रपटांमध्येही काम केले, ज्याची सुरुवात पैघम (१९५९) पासून झाली.

प्रारंभिक आयुष्य

[संपादन]

सरोजा देवी यांचा जन्म ७ जानेवारी १९३८ रोजी बंगळुरू येथे एका वोक्कालिगा कुटुंबात झाला. हे कुटुंब मूळचे म्हैसूर राज्याच्या (सध्याचे कर्नाटक) चन्नपटना तालुक्यातील धाशावरा येथील होते.[] त्यांचे वडील, भैरप्पा, म्हैसूरमध्ये पोलिस अधिकारी होते तर आई, रुद्रम्मा, गृहिणी होती. देवी ह्या कुटुंबातील चौथी मुलगी होती. त्यांचे शिक्षण बंगळुरूतील चामराजपेट येथील सेंट टेरेसा गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले.[]

भैरप्पा यांनी सरोजा यांना नृत्य शिकण्यास आणि अभिनयात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तरुण सरोजा देवी अनेकदा आपल्या वडिलांसोबत स्टुडिओमध्ये जात असत. देवी यांचे नाचून झाले की त्यांचे वडील काळजीपूर्वक सलंगाई बांधत असत आणि सुजलेल्या पायांना मालिश देखील करत असत.[] देवी यांना त्यांच्या आईने स्विमसूट आणि स्लीव्हलेस ब्लाउज न घालण्याची कडक सूचना दिली होती, ज्याचे त्यांनी आपल्या उर्वरित आयुष्यात पालन केले.[] १३व्या वर्षाच्या देवी यांना बी.आर. कृष्णमूर्ती यांनी एका कार्यक्रमात गाताना पाहिले होते. कृष्णमूर्ती यांनी त्यांना आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी देखील दिली, परंतु तेव्हा देवीने त्यांना नकार दिला.[]

अभिनयाची कारकिर्द

[संपादन]

सरोजा देवीचा पहिला चित्रपट आणि प्रथम मिळालेले मोठे यश म्हणजे होनप्पा भागवत यांचा कन्नड चित्रपट महाकवी कालिदास (१९५५) होता, ज्यामध्ये त्यांनी सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती. या चित्रपटाला कन्नड भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर, त्यांनी बीआर पंथुलु यांचा तमिळ चित्रपट थंगमलाई रागसियाम (१९५७) मध्ये काम केले, ज्यामध्ये त्यांनी एक नृत्य सादर केले होते. १९५० च्या दशकात कन्नड, तमिळ, तेलगू आणि हिंदीमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींपैकी ती एक होती.[] त्यानंतर, एमजी रामचंद्रन (एमजीआर) यांनी तिला नादोडी मन्नन (१९५८) मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून निवडले, या चित्रपटामुळे त्या तामिळनाडूतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनल्या होत्या. त्यानंतर त्यांना पैघम (१९५९) या हिंदी चित्रपटासाठी साइन अप करण्यात आले, ज्यामध्ये दिलीप कुमार यांनी देखील काम केले होते. देवी यांनी पुढे इतर आघाडीच्या हिंदी कलाकारांसोबत काम केले, ज्यात ससुराल (१९६१) मधील राजेंद्र कुमार, बेटी बेटे (१९६४) मधील सुनील दत्त आणि प्यार किया तो डरना क्या (१९६३) मधील शम्मी कपूर यांचा समावेश होता. देवी यांनी राज कपूरसोबत नजराणा (१९६१) साठी काही दृश्ये देखील शूट केली, परंतु दिग्दर्शक सीव्ही श्रीधर यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर त्यांची जागा वैजयंतीमाला यांनी घेतली.[]


१९६९ मध्ये, सरोजा देवी यांना भारत सरकारकडून चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री आणि १९९२ मध्ये तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण मिळाला होता. याच सोबत त्यांना बंगळुरू विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी आणि तामिळनाडू राज्याकडून कलैमामणी पुरस्कार मिळाला.

राज्य पुरस्कार प्राप्त सरोजा देवी

१ मार्च १९६७ रोजी, सरोजा देवी यांनी अभियंता असलेल्या श्री हर्षाशी लग्न केले,[][] ज्यांनी त्यांना आर्थिक संकट आणि आयकर समस्यांवर मात करण्यास मदत केली आणि त्यांना आर्थिक व्यवस्थापन शिकवले.[] लग्नानंतर देखील हर्ष यांनी सरोजा देवीच्या अभिनय कारकिर्दीलाही पाठिंबा दिला. १९६७ मध्ये आपल्या आईच्या आग्रहानंतरही देवी यांनी अभिनय का थांबवला नाही असे एका मुलाखतीत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले,"दिलीपकुमार यांनी आपली पत्नी सायरा बानो यांना लग्ना नंतर देखील अभिनय करणे थांबवू नये असा सल्ला दिला होता. ही गोष्ट राजेश खन्ना यांनी माझे पती श्री हर्ष यांना सांगितली आणि मला अभिनय करण्यापासून रोखू नये असा सल्ला दिला."[१०] गंभीर आजारामुळे १९८६ मध्ये हर्षा यांचे निधन झाले.

सरोजा देवी यांनी आपली भाची, भुवनेश्वरी हिला दत्तक घेतले, परंतु ती लहानपणीच मरण पावली;[] म्हणून मग देवी यांनी तिच्या स्मरणार्थ साहित्यासाठी भुवनेश्वरी पुरस्कार प्रायोजित केला.[११]

वयाशी संबंधित आजाराने ग्रस्त असलेल्या सरोजा देवी १४ जुलै २०२५ रोजी बंगळूर मधील मल्लेश्वरम येथील त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यू समयी त्या ८७ वर्षांच्या होत्या.[१२][१३][१४]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
२००८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना सरोजा देवी.

राष्ट्रीय पुरस्कार

राज्य पुरस्कार

  • २००९ - तामिळनाडू सरकारकडून कलाइमामणी जीवनगौरव पुरस्कार
  • २००९ - कर्नाटक सरकारकडून डॉ. राजकुमार जीवनगौरव पुरस्कार
  • २००९ - २००९ मध्ये आंध्र प्रदेश सरकारकडून दुसऱ्यांदा एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार .
  • २००१ - २००१ सालासाठी आंध्र प्रदेश सरकारकडून एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार .
  • १९९३ - तामिळनाडू सरकारचा एमजीआर पुरस्कार
  • 1988 – कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार
  • 1980 – कर्नाटक राज्याकडून अभिनंदन-कांचना माला पुरस्कार
  • १९६९ - कुल विलक्कूसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार
  • 1965 - कर्नाटककडून अभिनय सरस्वती सन्मान

इतर पुरस्कार

  • 2024 - प्रजावाणी सिने सन्मान तर्फे जीवनगौरव पुरस्कार
  • २००९ - नाट्य कलाधर पुरस्कार - तमिळ सिनेमा, भरत कलाचर चेन्नई
  • २००७ - कर्नाटक तेलुगू अकादमीकडून उल्लेखनीय कामगिरीसाठी एनटीआर पुरस्कार.
  • २००७ - चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ चेन्नई कडून रोटरी शिवाजी पुरस्कार.
  • २००६ - बंगळुरू विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट
  • २००६ - तमिळ चित्रपटातील योगदानासाठी विजय पुरस्कार
  • २००३ - अष्टपैलू कामगिरीसाठी दिनाकरण पुरस्कार
  • १९९७ - चेन्नईमध्ये सिनेमा एक्सप्रेस कडून जीवनगौरव पुरस्कार.
  • १९९४ - फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार - दक्षिण

वारसा

[संपादन]

२०१० मध्ये, भारतीय विद्या भवनने दरवर्षी कला क्षेत्रातील कलाकारांना सन्मानित करण्यासाठी "पद्मभूषण बी. सरोजा देवी राष्ट्रीय पुरस्कार" हा जीवनगौरव पुरस्कार सुरू केला. पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये केजे येसुदास, वैजयंतीमाला, अंजली देवी, अंबरीश, जयंती आणि इतरांचा समावेश आहे. [१७]

संदर्भ

[संपादन]
  1. T.M. Ramachandran, ed. (1964). Film World, Volume 1. p. 145.
  2. Ali, Mansoor (6 January 2015). "From France With Love". The New Indian Express (इंग्रजी भाषेत).
  3. Pavithra Srinivasan. "Celebrating Saroja Devi: The Beginning" Check |url= value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 29 October 2015 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. 1 2 Renuka Narayanan (5 September 2008). "The sweet bird of Southern cinema". Hindustan Times.
  5. "B Saroja Devi in the list of greatest Indian actresses ever". The Times of India.
  6. Pavithra Srinivasan. "Celebrating Saroja Devi: Foray into movies" Check |url= value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 29 October 2015 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. G. Dhananjayan (2014). Pride of Tamil Cinema. Blue Ocean. p. 128.
  8. "Interview with B. Saroja Devi, the Queen of Tamil Cinema - 1". 22 April 2018.
  9. 1 2 Aruna Chandaraju (30 June 2006). "Journey down a glorious lane". द हिंदू.
  10. "Dr. B Saroja Devi - A Model Actress - Saroja Devi known for her philanthropic gestures has donated a". models.indiafashionmodels.com. June 25, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 June 2016 रोजी पाहिले.
  11. "Saroja ducks romance poser". The Times of India. 30 January 2008.
  12. "B Saroja Devi, veteran star who ruled the screen as Abhinaya Saraswati, dies at 87" (इंग्रजी भाषेत). Hindustan Times. 14 July 2025. 14 July 2025 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 July 2025 रोजी पाहिले.
  13. "Veteran actor B Saroja Devi, fondly called 'Abhinaya Saraswathi', passes away at 87" (इंग्रजी भाषेत). द इंडियन एक्सप्रेस. 14 July 2025. 14 July 2025 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 July 2025 रोजी पाहिले.
  14. Pavithra Srinivasan. "Celebrating Saroja Devi" Check |url= value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 29 October 2015 रोजी पाहिले.[permanent dead link]
  15. 1 2 "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
  16. "Multi-lingual actress Jayanti wins B Saroja Devi National Award". 11 October 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित.