Jump to content

बी.पी. सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बी.पी. सिंग
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावB. संपादन
आडनावसिंह संपादन
जन्म तारीख1935 संपादन
जन्मस्थानदेहरादून संपादन
मृत्यू तारीख२७ ऑक्टोबर 2026 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी संपादन
व्यवसायtelevision director, दूरदर्शन निर्माता संपादन
पदChairman of the Film and Television Institute of India संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाभारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था संपादन

बृजेंद्र पाल सिंग उर्फ बी.पी. सिंग (२७ एप्रिल, १९४९ – २७ ऑक्टोबर, २०२६), हे एक भारतीय दूरचित्रवाणी निर्माते होते. ते भारतातील सर्वात प्रदीर्घ काळ चाललेल्या टीव्ही मालिकांपैकी एक असलेल्या सी.आय.डी. (१९९८–२०१८; २०२४–२०२५) या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक-निर्माते होते.[१][२] या मालिकेने २०१० मध्ये 'सीआयडी गॅलंट्री अवॉर्ड्स' (शौर्य पुरस्कार) सुरू केले होते.[३] सिंग यांनी सी.आय.डी. मालिकेत डी.सी.पी. शमशेर सिंग चित्रोळे ही भूमिका वेळोवेळी साकारली होती.

सिंग यांनी सोनी टीव्हीवरील आहट (१९९५–२०१५) या थरार/हॉरर मालिकेची निर्मिती देखील केली होती.[४]

८ ऑक्टोबर २००४ रोजी, सी.आय.डी. मालिकेची ६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त "द इनहेरिटन्स" / सी.आय.डी. १११ हा एक विशेष भाग सलग १११ मिनिटे (१ तास ५१ मिनिटे) एकाच शॉटमध्ये चित्रित करण्यात आला होता. यामुळे या शोची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स मध्ये "सर्वात मोठा सलग शॉट असलेला टीव्ही शो" म्हणून झाली.[५] त्यांनी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) चे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

प्रारंभिक आयुष्य आणि कारकीर्द

[संपादन]

सिंग यांचा जन्म भारतातील डेहराडून येथे झाला आणि त्यांनी पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (FTII) मधून शिक्षण घेतले.[६] त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९७३ मध्ये सरकारी टीव्ही वाहिनी दूरदर्शनवर बातम्यांचे कॅमेरामन म्हणून केली. त्यांनी पुढील १० वर्षे कॅमेरामन म्हणून काम केले. पुढे ते मुंबई येथे गेले आणि त्यांनी दूरदर्शनसाठी 'सिर्फ चार दिन' हा मर्डर मिस्ट्री टीव्ही चित्रपट बनवला. या चित्रपटाच्या तयारीत असताना त्यांनी पोलिसांच्या क्राईम ब्रांचला भेट देण्यास सुरुवात केली आणि त्यांची इन्स्पेक्टर जयंत वागळे यांच्याशी मैत्री झाली; या प्रक्रियेत त्यांना शोधकार्यात (डिटेक्टिव्ह वर्क) आयुष्यभराचा रस निर्माण झाला. त्या चित्रपटात नाना पाटेकर, दिलीप कुलकर्णी, मनोरमा वागळे, जाह्नवी आणि कल्पिता मालपाठक (राजोपाध्ये) यांनी अभिनय केला होता. त्यानंतर त्यांनी १९८८ साली दूरदर्शनसाठी 'एक शून्य शून्य' ही मराठी टीव्ही मालिका तयार केली. मुंबईत स्थलांतरित झाल्यावर त्यांनी दूरदर्शनसाठी अजून काही मराठी मालिका बनवल्या.[७]

आहट ही हॉरर मालिका प्रथम १९९४ मध्ये सस्पेन्स थ्रिलर म्हणून चित्रित करण्यात आली होती आणि १९९५ मध्ये तिचे प्रक्षेपण सुरू झाले. परंतु याच संकल्पनेवर आधारित सुमारे ४० भाग झाल्यानंतर, अलौकिक/गूढ (सुपरनॅचरल) संकल्पनेवर एक भाग बनवण्यात आला. या भागामुळे मालिकेचे टीआरपी वेगाने वाढल्याने मालिकेचे स्वरूप पूर्णपणे बदलण्यात आले.[६]

त्यांच्या कारकीर्दीला महत्त्वाचे वळण सोनी टीव्ही वाहिनीची सुरुवात आणि १९९८ मधील सी.आय.डी. मालिकेच्या शूटिंगमुळे मिळाले. ही मालिका मुंबईतील क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट (CID) साठी काम करणाऱ्या डिटेक्टिव्ह्सच्या टीमवर आधारित आहे. याशिवाय त्यांनी २०१० मध्ये 'गुटुर गू' ही भारतातील पहिली सायलेंट (मूक) कॉमेडी मालिका देखील सुरू केली.[८]

त्यांनी लाईफ ओके वाहिनीवर 'हम ने ली है... शपथ' नावाचा एक गुन्हेगारीवर आधारित शो देखील सुरू केला, जो पोलिस निरीक्षक आणि एका समाजसेवकावर आधारित होता. या मालिकेला उत्तम टीआरपी मिळत होता आणि बी. पी. सिंग यांचा हा दुसरा क्राईम शो होता.

वैयक्तिक आयुष्य आणि निधन

[संपादन]

सिंग यांचा विवाह एका कॅनेडियन महिलेशी झाला होता.

सिंग यांचा मोठा मुलगा, सलील सिंग, याचा २५ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबई येथे 'सावधान इंडिया'च्या सेटवर शूटिंग करत असताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.[९]

२७ ऑक्टोबर २०२६ रोजी, मुंबईतील त्यांच्या घरी झोपेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने सिंग यांचे निधन झाले. जवळ असलेल्या सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत्यू समयी सिंग ७७ वर्षांचे होते.[१०][११]

चित्रपट सूची

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका
२०१२ एजंट विनोद रॉ (RAW) चीफ हसन नवाज
१९८४ सिर्फ चार दिन दिग्दर्शक

वेब मालिका

[संपादन]
वर्ष शीर्षक टीप
२०१९–२०२२ अभय निर्माते

दूरचित्रवाहिनी

[संपादन]
वर्ष मालिका / शो भूमिका
१९८८ एक शून्य शून्य निर्माते
१९९८–२०१८ सी.आय.डी. डी.आय.जी. / डी.सी.पी. शमशेर सिंग चित्रोळे / दिग्दर्शक / निर्माते
१९९५–२०१५ आहट दिग्दर्शक / निर्माते
२००४–२००६ सी.आय.डी. स्पेशल ब्युरो निर्माते
२००२ अचानक ३७ साल बाद दिग्दर्शक / निर्माते
२००४ रात होने को है दिग्दर्शक / निर्माते
२००८ जिंदगी बदल सकता है हादसा दिग्दर्शक
२०१०–२०१४ गुटुर गू निर्माते
२०११ सूर्या द सुपर कॉप निर्माते
२०१२ अदालत सी.आय.डी. मधील डी.सी.पी. शमशेर सिंग (चित्रोळे)
२०१२–२०१७ सुपरकॉप्स व्हर्सेस सुपर व्हिलन्स दिग्दर्शक / निर्माते / संकल्पना
२०१९–२०२० दिव्य दृष्टी निर्माते

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "What makes this TV show such a hit with Indians?". 27 July 2010. 16 June 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 March 2011 रोजी पाहिले.
  2. ↑ "BUSTING CRIME: Of iconic status". डेक्कन हेराल्ड. 2 March 2011. 23 September 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 March 2011 रोजी पाहिले.
  3. ↑ "Honour to ordinary". द इंडियन एक्सप्रेस. 17 September 2010.
  4. ↑ "C. I. D. heads for big screen". द टाइम्स ऑफ इंडिया. 18 January 2011.[मृत दुवा]साचा:Cbignore
  5. ↑ "A long shot at a record". Indian Express. 6 November 2004.[मृत दुवा]साचा:Cbignore
  6. 1 2 "I have made mistakes". Indian Express. 18 December 1998.
  7. ↑ "Behind the chills". The Hindu. 22 September 2010. 22 February 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 September 2026 रोजी पाहिले.
  8. ↑ "Gutur Gu: India's first silent comedy". द टाइम्स ऑफ इंडिया. 5 March 2010. 4 November 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  9. ↑ "CID producer BP Singh's elder son dies of heart attack". The Times of India. 2017-10-25. ISSN 0971-8257. 2026-10-28 रोजी पाहिले.
  10. ↑ Farzeen, Sana (27 October 2026). "CID, Aahat creator BP Singh dies in Mumbai; actor Dayanand Shetty pays tribute". India Today (इंग्रजी भाषेत).
  11. ↑ "'CID' producer BP Singh passes away, Ashoke Pandit pays an emotional tribute; calls him a great human being and a dear friend". The Times of India. 27 October 2026.