बीना शेठ लष्करी
डोअर स्टेप स्कूलची संस्थापिका | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
बीना शेठ लष्करी ह्या एक भारतीय डोअरस्टेप स्कूलची संस्थापिका आहेत. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून (१९८८- २०१९) त्यांनी जवळपास मुंबईतील १,००,००० मुलांना घरी जाऊन शिक्षण देण्याचे आयोजन करण्यात मदत केली आहे. या कामासाठी त्यांना २०१३ सालीत नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जीवन
[संपादन]लस्करीने बाल मानसशास्त्रात पदवी पूर्ण केली आहे. १९८८ मध्ये कुलाब्यातील कफ परेड येथे लष्करी यांनी पहिली शाळा स्थापन केली. त्या वेळी झोपडपट्टीतील फारशी मुले शाळेत जात नसत. या शाळेत सुरुवातीला केवळ २५ मुले येत होती. या मुलांचे बंजारा पालक कमी वेतनावर मासेमारीचे काम करत होते.[१]
स्थानिक शाळेला भेट दिली असता त्यांना तीन-चार वर्षांनी मुले शाळा सोडून देत असल्याचे दिसुन आले. मुलांच्या पालकांना भेटल्यावर त्यांना असे आढळले की ही मुले आपल्या कुटुंबाच्या कमाईचा एक आवश्यक भाग आहेत. घर चालवण्यासाठी मुलांना देखील काम करावे लागत होते. रजनी परांजपे यांच्या मदतीने लष्करी यांनी एक शाळा सुरू केली जी त्यांच्या दाराशी जाऊन शिक्षण देईल.[२]

२०१३ मध्ये जागतिक महिला दिनी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात आलेल्या सहा पुरस्कारांपैकी एक होता. शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांचे नाव सुचवले होते.[३]
२०१६ मध्ये केंब्रिजचे ड्यूक आणि डचेस लष्करी यांना मुंबईत भेटायला आले होते.[४] त्या वर्षी शाळेच्या मोहिमेमुळे रस्त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांची नावे देण्यात आली. यापूर्वी मुंबईतील तीन भागातील निनावी रस्त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांची नावे देण्यात आली होती. इतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षा बाळगण्यासाठी प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे.[२]
२०१९ मध्ये एक असा अंदाज होता की गेल्या ३१ वर्षांत लष्करी यांनी मुंबईतील १,००,००० मुलांच्या शिक्षणाचे आयोजन करण्यात मदत केली आहे. तोपर्यंत शाळेत सात 'पिवळ्या स्कूल बस' होत्या, ज्यामध्ये शालेय उपकरणे होती. त्यापैकी प्रत्येक बस दिवसातून चार वेळा अडीच तास थांबते, म्हणजे प्रत्येक बस दररोज १०० मुलांना शिकवत आहे.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "From Doorstep to On Wheels: How This Woman Taught Over 1 Lakh Slum Kids in 30 Yrs". The Better India (इंग्रजी भाषेत). 2019-11-12. 2020-04-19 रोजी पाहिले.
- ^ a b "This NGO is Motivating Slum Kids to Stay in School By Naming Alleys and Streets After Them". The Better India (इंग्रजी भाषेत). 2016-05-19. 2020-04-19 रोजी पाहिले.
- ^ "President Confers Stree Shakti Puruskar on International Women's Day". pib.gov.in. 2020-04-20 रोजी पाहिले.
- ^ Door Step School NGO (23 June 2016). "Duke & Duchess of Cambridge with Door Step School Mumbai team". 23 June 2022 रोजी पाहिले – Youtube द्वारे.