बीना देवी
Indian mushroom cultivator | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | इ.स. १९७७ मुंगेर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
![]() |
बीना देवी ह्या एक भारतीय महिला राजकारणी आहेत. यांनी आपल्या परिसरातील महिलांना मशरूम लागवडीद्वारे उद्योजक बनण्यास प्रेरित केले. मशरूम लागवड लोकप्रिय केल्याबद्दल त्यांना 'मशरूम महिला' असे टोपणनाव लाभले. आणि याच कारणाने त्या पाच वर्षांसाठी तेतियाबांबर ब्लॉक मधील धौरी पंचायतीच्या सरपंच बनल्या. त्यांनी शेतकऱ्यांना मशरूम, सेंद्रिय शेती, गांडूळ खत उत्पादन आणि सेंद्रिय कीटकनाशके तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.

९ मार्च २०२० रोजी, देवी यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१]
प्रारंभिक आयुष्य
[संपादन]बीना देवी ह्या तिलकरी नावाच्या एका छोट्या गावाच्या रहिवासी असून त्यांचा जन्म सन १९७७ मध्ये झाला.[२]
कारकिर्द
[संपादन]सुरुवातीला देवीने स्वतःच्या घरी पलंगाखाली थोडेसे मशरूम वाढवले. यामुळे त्यांना ही एक फायद्याची बाब असल्याचे जाणवले.[२]
देवी दुग्धव्यवसाय आणि शेळी पालन करतात. याच सोबत त्यांनी ग्रामीण महिलांमध्ये स्वयंरोजगाराला प्रेरणा देण्याचे काम केले. त्यांनी मुंगेर जिल्ह्यातील पाच ब्लॉक आणि शेजारच्या १०५ गावांमध्ये मशरूम उत्पादन लोकप्रिय केले आहे, ज्याचा फायदा १५०० महिलांना झाला.[३]

डिजिटल साक्षरता पसरवण्यात देवीचा सहभाग होता. टाटा ट्रस्ट्स कडून निधीत मिळालेला मोबाईल फोन कसा वापरायचा याचे त्यांनी ७०० महिलांना प्रशिक्षण दिले. त्यांनी एसआरआय पद्धतीच्या पीक शेतीचे २,५०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे आणि बचत गट तयार करण्यास प्रवृत्त केले.[३]
महिला दिनानिमित्त पंतप्रधानांचे ट्विटर खाते सांभाळणाऱ्या स्नेहा मोहनदास, मालविका अय्यर, काश्मिरी नुम्धा, आरिफा जान, कल्पना रमेश, विजया पवार आणि कलावती देवी यांच्यानंतर बीना देवी या सातव्या महिला ठरल्या.[४]
९ मार्च २०२० रोजी, देवी यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१]

मशरूम शेती बद्दल बोलताना देवी म्हणतात: "या शेतीमुळे मला आदर मिळाला. मी बिहारमधील धौरी पंचायतीची सरपंच झाले. माझ्यासारख्या महिलांना यातून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत आहे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे."[३]
अलिकडेच देवी यांना बिहारमधील मुंगेर येथे झालेल्या मातृशक्ती संमेलनात 'प्रतिभा सन्मान' देऊन सन्मानित करण्यात आले. २५ डिसेंबर २०२३ रोजी मुंगेर येथील लखीसराय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संदर्भ
[संपादन]- ^ a b Dainik Bhaskar Hindi (8 March 2020). "Women's Day 2020: President Kovind awarded Nari Shakti Puraskar to Bina Devi and many women | Women's Day 2020: 103 वर्षीय मान कौर को नारी शक्ति पुरस्कार, 'मशरूम महिला' भी सम्मानित". bhaskarhindi.com. 2020-03-12 रोजी पाहिले.
- ^ a b Agarwal, Rishika (2020-03-17). "Bihar's daughter, Bina Devi famous as Mushroom Mahila was awarded the Nari Shakti Award". PatnaBeats (इंग्रजी भाषेत). 2020-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-09 रोजी पाहिले.
- ^ a b c "Get out, work yourself: Mushroom Mahila message to women". www.outlookindia.com/. 2021-01-05 रोजी पाहिले.
- ^ "Get out, work yourself: 'Mushroom Mahila' message to women | INDIA New England News". indianewengland.com. 2020-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-12 रोजी पाहिले.