बिचोम जिल्हा
Appearance
बिचोम जिल्हा
| स्थापना | ४ मार्च 2024 |
|---|---|
| देश | भारत |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | अरुणाचल प्रदेश |
बिचोम जिल्हा हा ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील २८ जिल्ह्यांपैकी एक आहे. नापांगफुंग हे त्याचे मुख्यालय आहे.[१]
इतिहास
[संपादन]नोव्हेंबर २०२३ मध्ये, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी बिचोम जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा केली.[२] फेब्रुवारी २०२४ मध्ये, मंत्रिमंडळाने जिल्हा निर्मितीच्या विधेयकाला मंजुरी दिली. पश्चिम कामेंग जिल्ह्यातून २७ गावे आणि पूर्व कामेंग जिल्ह्यातून २८ गावे वेगळी करून हा जिल्हा तयार करण्यात आला आहे.[३] ७ मार्च २०२४ रोजी, मुख्यमंत्री खांडू यांच्या हस्ते जिल्ह्याचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.[४] अका आणि मिजी जमातींनी केलेल्या मागणीनंतर हा जिल्हा तयार करण्यात आला.[५]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Arunachal Assembly passes bill for two new districts". India Today NE (हिंदी भाषेत). 2024-02-08. 2024-02-25 रोजी पाहिले.
- ↑ "Arunachal: Union Minister Kiren Rijiju and CM Pema Khandu announce Bichom district, unleash wave of development in Seppa". India Today NE (इंग्रजी भाषेत). 2023-11-20. 2024-02-25 रोजी पाहिले.
- ↑ "Arunachal assembly passes bill to create two new districts". The Week (इंग्रजी भाषेत). 2024-02-25 रोजी पाहिले.
- ↑ "Arunachal CM Pema Khandu inaugurates new Bichom district". India Today NE (हिंदी भाषेत). 2024-03-07. 2024-03-08 रोजी पाहिले.
- ↑ "The Politics Behind Reviving the Demand for a Mon Autonomous Council in Arunachal". The Wire. 2024-02-25 रोजी पाहिले.