Jump to content

बिकिनी एटोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिकिनी एटोल हे मार्शल द्वीपसमूहातील प्रवाळाच्या बेटांचा समूह आहे. [] १८०० आणि १९४६ दरम्यान यांना एश्शॉल्ट्ज एटोल म्हणून नाव होते. [] एकूण २२९.४-चौरस-मैल (५९४.१ चौ. किमी) क्षेत्रात ही २३ बेटे आहेत व मध्ये समुद्रसरोवर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर, १९४६ मध्ये येथील मूळ रहिवाशांना बळजबरीने स्थलांतरित करण्यात आले, [] त्यानंतर १९५८ पर्यंत अमेरिकेने येथे २३ अणुचाचण्या केल्या होत्या.

हा द्वीपसमूह अमेरिकेच्या आधिपत्याखाली असून याचे प्रशासकीय केन्द्र माजुरो येथे आहे.

हा द्वीपसमूह रॅलिक साखळीच्या उत्तरेकडील टोकावर आहे, १९७० मध्ये बिकिनी बेटावर तीन कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले, एकूण सुमारे १०० रहिवासी. परंतु शास्त्रज्ञांना मे १९७७ मध्ये विहिरीच्या पाण्यात स्ट्राँशियम-९०ची पातळी धोकादायक असल्याचे आढळले तसेच तेथील रहिवाशांच्या शरीरात सिझियम-१३७ चे प्रमाण असामान्यपणे जास्त होते. १९८० मध्ये त्यांचे स्थलांतरित करण्यात. आते येथे तात्पुरती तुरळक वस्ती असते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Marshallese-English Dictionary-Place Name Index". 27 October 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 August 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "The Marshall Islands: A Brief History". 15 October 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 August 2013 रोजी पाहिले.
  3. ^ Kiste, Robert C. (1974). The Bikinians : a study in forced migration (PDF). Menlo Park, Calif.: Cummings Pub. Co. ISBN 0846537524. 2 August 2021 रोजी पाहिले.