बावखळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बावखळ म्हणजे खळ्यासारखी बाव.खळे म्हणजे उथळ पसरट भाग. बाव म्हणजे विहीर. पावसाळ्यात जो पाऊस पडतो तो ह्या बावखळात आपोआप साठला जातो. बावखळ पसरट असल्याने त्यामध्ये आजूबाजूचे पावसाचे पडलेले पाणी सहजरित्या जमा होते. पावसाळ्यानंतर बागायती साठी हेच पाणी उपयोगी पडते. पूर्वी बावखळावर लाकडी रहाट असे. हल्ली बरीच बावखळे बुजवून टाकली आहेत आणि बागायती सुद्धा कमी झाली आहे. वसई तालुक्यात साधारणपणे ३००० बावखळे आहेत. हल्ली काही स्थानिक नवतरुण पर्यावरणप्रेमी लोकांनी बुजवलेली बावखळे साफ करून त्यामध्ये पुन्हा पाणी साठवायला सुरुवात केलेली आहे.

संदर्भ[संपादन]

मुंबई टाईम्स २९/०५/२०२०.