Jump to content

बाळासाहेब मांगुळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाळासाहेब मांगुळकर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख1959 संपादन

अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर (४ डिसेंबर, १९५८:यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे १५व्या विधानसभेवर निवडून गेले. [] []

मांगुळकर हे यवतमाळ शहराजवळील भारी या छोट्याशा गावातील आहेत. त्यांचे वडील शंकरराव बळीरामजी मांगुळकर शेतकरी होते. त्यांनी यवतमाळ येथील अँग्लो हिंदी हायस्कूलमधून बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. [] ते सलग तीन वेळा राज्यसभा सदस्य राहिलेले विजय दर्डा आणि त्यांचे दिवंगत वडील महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी चार वेळा सदस्य आणि कॅबिनेट मंत्री जवाहरलाल दर्डा आणि यवतमाळच्या दर्डा कुटुंबाचे जवळचे सहकारी मानले जातात. मांगुळकर यवतमाळचे माजी आमदार दिवंगत निलेश देशमुख पारवेकर यांचेही जवळचे मित्र होते.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मांगुळकर यांचा भाजपच्या मदन येरावार यांच्याकडून २,२५३ मतांनी पराभव झाला. परंतु २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी यवतमाळमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत पुढील निवडणूक जिंकली. त्यांनी ११७,५०४ मते मिळवली आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे मदन येरावार ११,३८१ मतांनी पराभव केला. [] []

संदर्भ

[संपादन]
  1. "Yavatmal Election Result 2024 LIVE: Anil Alias Balasaheb Shankarrao Mangulkar of INC Wins". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-12-04 रोजी पाहिले.
  2. The Times of India (23 November 2024). "Yavatmal Constituency Election Results 2024" (इंग्रजी भाषेत). 13 December 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 December 2024 रोजी पाहिले.
  3. "Anil Alias Balasaheb Shankarrao Mangulkar(Indian National Congress(INC)):Constituency- YAVATMAL(YAVATMAL) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2024-12-04 रोजी पाहिले.
  4. "Anil Alias Balasaheb Shankarrao Mangulkar, INC Candidate from Yavatmal Assembly Election 2024 Seat: Electoral History & Political Journey, Winning or Losing - News18 Assembly Election 2024 Result News". www.news18.com (इंग्रजी भाषेत). 2024-12-04 रोजी पाहिले.
  5. Election Commission of India (23 November 2024). "Maharastra Assembly Election Results 2024 - Yavatmal". 13 December 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 December 2024 रोजी पाहिले.