Jump to content

बालेन शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बालेन शाह
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वनेपाळ संपादन
स्थानिक भाषेतील नावबालेन्द्र शाह (बालेन), 𑒥𑒰𑒪𑒹𑒢𑓂𑒠𑓂𑒩 𑒬𑒰𑒯, 𑂥𑂰𑂪𑂵𑂢𑂹𑂠𑂹𑂩 𑂬𑂰𑂯 संपादन
आडनावShah संपादन
जन्म तारीख२७ एप्रिल 1990 संपादन
जन्मस्थानकाठमांडू संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषानेपाळी भाषा, मैथिली भाषा संपादन
व्यवसायrapper, राजकारणी, structural engineer संपादन
पदMayor of Kathmandu, Member of the House of Representatives of Nepal, नेपाळचे पंतप्रधान संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2012 संपादन
राजकीय पक्षाचा सभासदRastriya Swatantra Party संपादन
धर्मबौद्ध धर्म संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://balenformayor.com संपादन

बालेंद्र शाह उर्फ बालेन (जन्म: एप्रिल २७, १९९०) हे एक संरचनात्मक अभियंता (स्ट्रक्चरल इंजिनिअर) आणि माजी रॅपर आहेत. त्यांनी ३० मे २०२२ पासून १८ जानेवारी २०२६ पर्यंत काठमांडूचे १५ वे महापौर म्हणून काम पाहिले.[] काठमांडूचे महापौर म्हणून निवडून येणारे ते पहिले स्वतंत्र उमेदवार होते.[]

शाह २०१२ पासून नेपाळी हिप-हॉप उद्योगाचा एक भाग आहेत. २०२२ च्या स्थानिक निवडणुकीत, शाह महापौर म्हणून निवडून आले. त्यांनी नेपाळी काँग्रेसच्या उमेदवार श्रीजना सिंग आणि सीपीएन (यूएमएल) चे उमेदवार आणि काठमांडूचे माजी महापौर केशव स्थापित यांचा पराभव केला.[]

महापौर म्हणून, शाह यांच्या कार्यकाळात कचरा व्यवस्थापन आणि रस्ते वाहतूक नियंत्रण यात चांगल्या सुधारणा झाल्या. परंतु बेकायदेशीरपणे बांधलेल्या खाजगी इमारती पाडणे आणि रस्त्यावरील विक्रेत्यांचा प्रशासनाद्वारे होणारा छळ यासारख्या जटिल मुद्द्यांवर त्यांच्या कडक दृष्टिकोनामुळे ते अत्यंत वादग्रस्त ठरले.[] जानेवारी २०२६ मध्ये, शाह यांनी काठमांडूच्या महापौरपदाचा राजीनामा दिला आणि २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुका लढवण्यासाठी राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (RSP) मध्ये सामील झाले.[]

आयुष्य

[संपादन]

शाह यांचा जन्म २७ एप्रिल १९९० रोजी काठमांडूतील नरदेवी येथे एका तेली मधेशी[] कुटुंबात झाला. शाह यांचे कुटुंब मैथिली परंपरेशी निगडित आहे.[][][] ते आयुर्वेदिक व्यवसायी रामनारायण शाह आणि ध्रुवदेवी शाह यांचे सर्वात धाकटे पुत्र आहेत.[१०] त्यांच्या वडिलांची नरदेवी आयुर्वेदिक रुग्णालयात नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे पालक मधेश प्रांतातील महोत्तरी जिल्ह्यातून काठमांडूला स्थलांतरित झाले.[]

शाह यांनी १०+२ चा अभ्यास व्हीएस निकेतन उच्च माध्यमिक शाळेत केला. त्यांनी हिमालयन व्हाइटहाऊस इंटरनॅशनल कॉलेजमधून स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग)मध्ये पदवी (बीइ) मिळवली.[११] त्यांनी कर्नाटक मधील 'विश्वेश्वरय्या तांत्रिक विश्वविद्यालय' (इंग्लिश:विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) (लघुरूप:व्हीटीयू) मधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी (एमटेक) देखील मिळवली. शाह यांना काठमांडू विद्यापीठातून 'पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नेवा वारसा संरचनांचे संवर्धन' या विषयावर स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये विद्यावाचस्पती (पीएचडी) अभ्यासासाठी केयू संशोधक फेलोशिप देण्यात आली.[१२]

शाह यांचे लग्न सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक सबीना काफ्ले यांच्याशी झाले आहे.[११] ते आपल्या पत्नी आणि मुलीसोबत तिनकुने येथील गैरीगाउँमध्ये राहतात. बालेन शाह बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. काही स्रोतांनुसार ते मधेशी बौद्ध असल्याचे सांगितले जाते, तर इतर काही दाव्यांनुसार ते नेवार बौद्ध परंपरांचे पालन करतात.[][१३][१४][१५][१६][१७][१८]

संगीत कारकीर्द

[संपादन]

शाह २०१० च्या दशकाच्या सुरुवातीपासून नेपाळच्या हिप-हॉप संगीतात सहभागी आहेत. २०१२ मध्ये जेव्हा ते नववीत होते तेव्हा त्यांनी आपलेहिले एकल 'सडक बालक' रिअल्बम प्रदर्शित केले. हे गाणे शहरी तरुणांच्या कष्टाचे वर्णन करते. या प्रकाराला नेफॉप (नेपाळी हिप-हॉप) असे संबोधले जाते.[१९] २०१३ मध्ये जेव्हा त्यांनी युट्यूब बॅटल रॅप मालिका रॉ बार्जमध्ये भाग घेतला, तेव्हा त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली आणि नेपाळच्या हिप-हॉप समुदायात त्यांची वर्णी लागली.[१९]

शाह आपल्या आपल्या संगीताद्वारे सामाजिक जागरूक विषयांना हात घालतात. याद्वारे ते नेपाळमधील भ्रष्टाचार, असमानता आणि शहरी जीवन यासारख्या समस्यांना संबोधित करते. 'बलिदान' हा त्यांचा एक दखल घेतला गेलेला उल्लेखनीय ट्रॅक आहे. यात त्यांनी राजकीय भ्रष्टाचारावर टीका केली. या गाण्याने तरुण प्रेक्षकांशना मोहित केले. या आणि अशा गाण्याद्वारे त्यांची अप्रत्यक्ष राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली.[२०]

२०२५ मध्ये, शाह यांनी नेपाळी चित्रपट लाज शरणमच्या साउंडट्रॅकसाठी 'नेपाळ हसेको...' हे गाणे सादर केले. हे गाणे त्यांनी पूर्वीच लिहून, संगीतबद्ध केलेले होते. हे गाणे मूळतः त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज झाले होते आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते पुन्हा जारी करण्यात आले. दुसऱ्यांदा रिलीज झाल्यानंतर ते यूट्यूब ट्रेंडिंग म्युझिक चार्टमध्ये लवकर दाखल झाले.[२१][२२]

राजकीय कारकीर्द

[संपादन]
२०२२ मध्ये शाह

काठमांडूचे महापौर (2022-2026)

[संपादन]

शहा यांनी काठमांडूच्या महापौरपदासाठी भ्रष्टाचारविरोधी, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या मुद्द्यांवर भर दिला [२३]

पारदर्शकता

[संपादन]

महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सर्व प्रथम, शाह यांनी नगरपरिषदेच्या बैठकांचे थेट प्रक्षेपण सुरू केले. शहरात अशा प्रकारचा हा पहिला प्रयोग होता.[२४][]

घनकचरा व्यवस्थापन

[संपादन]

६ जून २०२२ रोजी, नगरविकास मंत्रालय आणि नवनिर्वाचित प्रतिनिधींमध्ये ७ जूनपासून कचरा विल्हेवाट लावण्यास सुरुवात करण्याचा करार झाला आणि १८ ऑगस्ट २०२२ रोजी, स्थानिक आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चार कलमी करारानंतर, शाह यांनी खाजगी कंपन्यांना सर्व न गोळा केलेल्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले.[२५]

बालेन शाह काठमांडू कचरा संकलन रेस कार्यक्रम (२०२२)

बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारती पाडणे

[संपादन]

शाह यांच्या नेतृत्वाखाली, काठमांडू मेट्रोपॉलिटन सिटीने अनेक खाजगी व्यवसायांना आणि नेपाळ पोलिसांसारख्या सरकारी संस्थांना सार्वजनिक जमिनीवर उल्लंघन करणाऱ्या सर्व संरचना काढून कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ३५ दिवसांची नोटीस बजावली. [२६] अखेर असंख्य बेकायदेशीरपणे बांधलेल्या संरचना पाडल्या गेल्या आणि शासनाला सार्वजनिक वापरासाठी जागा परत मिळवण्यात यश मिळाले.

शिक्षण

शाह यांनी सरकारी शाळांमध्ये 'पाठ्यपुस्तक-मुक्त शुक्रवार' कार्यक्रम सुरू केला ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ये शिकण्यास आणि इतर अभ्यासक्रमेतर क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यास मदत करणे हा होता. [२७] त्यांनी काठमांडूमधील सर्व खाजगी शाळांना सक्तीच्या आणि मोफत शिक्षण कायदा २०७५ आणि केएमसी शिक्षण कायदा २०७५ नुसार किमान १० टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास सांगितले [२८]

पुरस्कार आणि मान्यता

[संपादन]

टाईम मासिकाने २०२३ च्या "भविष्याला आकार देणाऱ्या १०० उदयोन्मुख नेत्यांच्या" यादीत शाह यांचा समावेश केला [२९]

संदर्भ

[संपादन]
  1. "Balen Shah resigns as mayor to contest March 5 elections". kathmandupost.com (English भाषेत). 2026-01-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. "Balen registers historical win in KMC". The Himalayan Times (इंग्रजी भाषेत). 2022-05-27. 2026-01-27 रोजी पाहिले.
  3. "Abdul Rahaman is the new mayor of Kathmandu Metropolitan City". kathmandupost.com (English भाषेत). 2026-01-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. "From Rap Star to Engineer to Young Mayor Demolishing Swaths of Kathmandu (Published 2023)" (इंग्रजी भाषेत). 2023-05-12. 2025-10-05 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2026-01-27 रोजी पाहिले.
  5. "Balendra Shah's hint at candidacy heats up Jhapa-5 politics".
  6. 1 2 "Balen Shah: Meet the Independent Mayor of Kathmandu Who Could Lead Nepal's Transition". Agenzia Nova (इंग्रजी भाषेत). 2025-09-10. 2026-03-09 रोजी पाहिले. Born in 1990 to a Madhese Buddhist family
  7. "Who is Balen Shah? From studying in Karnataka's Belagavi to being Gen Z's preferred pick for Nepal PM". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 10 September 2025 रोजी पाहिले.
  8. 1 2 3 "'Balen' canes parties with the walking stick". The Kathmandu Post (English भाषेत). 26 May 2022. 26 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 May 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. "'Balen' canes parties with the walking stick". The Kathmandu Post (English भाषेत). 26 May 2022. 26 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 May 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. "Who is Balen Shah? From studying in Karnataka's Belagavi to being Gen Z's preferred pick for Nepal PM". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2025-09-10 रोजी पाहिले.
  11. 1 2 सत्याल, मनोज (29 April 2022). "कालो चस्माभित्र लुकेका बालेन शाह". Setopati (इंग्रजी भाषेत). 26 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 May 2022 रोजी पाहिले.
  12. "Balen Shah Awarded 'KU Research Fellowship' – Dr. Balen in Three Years!". pardafas.com (इंग्रजी भाषेत). २०२६-०३-०७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०३-०७ रोजी पाहिले.
  13. "From Rapper to PM Frontrunner: Who Is Balen Shah?". Outlook India (इंग्रजी भाषेत). 2026-03-06. 2026-03-08 रोजी पाहिले.
  14. "Balen's Winning Tactics: Social media to become mayor, spiritual strategy to become MP". Nepal Khabar (इंग्रजी भाषेत). 2020-06-10. 2026-03-08 रोजी पाहिले.
  15. "Who is Balen Shah? From studying in Karnataka's Belagavi to being Gen Z's preferred pick for Nepal PM". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2026-03-08 रोजी पाहिले.
  16. Srivastava, Snehal (2026-03-06). "From Rapper to PM Frontrunner: Who Is Balen Shah?". Outlook India (इंग्रजी भाषेत). 2026-03-08 रोजी पाहिले.
  17. "Balen Shah, rapper-turned-politician defeats former prime minister in..."
  18. "Who is Balen Shah? From studying in Karnataka's Belagavi to being Gen Z's preferred pick for Nepal PM". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2026-03-06 रोजी पाहिले. Shah was born in the capital city in 1990 to a Newar Buddhist family of Maithil Madhesi origin
  19. 1 2 "Balen Shah". 2026-01-21 रोजी पाहिले YouTube द्वारे.
  20. "Nepali rapper turned mayor is young people's favourite in political crisis". Reuters. 2026-01-21 रोजी पाहिले.
  21. "Balen's song 'Nepal Haseko' hit YouTube Trending". Republica. 8 August 2024. 2026-01-21 रोजी पाहिले.
  22. "Balen's 'Laaj Sharanam' OST released". Kathmandu Post. 2026-01-21 रोजी पाहिले.
  23. "Balen's Eventful Tenure". GorakhaPatra. 2026-01-27 रोजी पाहिले.
  24. Khatiwada, Nishan (13 June 2022). "Early report card of Mayor Balen Shah". Nepal Live Today (इंग्रजी भाषेत). 2025-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 July 2023 रोजी पाहिले.
  25. "Balen: We're committed to proper waste management". nepalnews.com. 17 August 2022. 7 March 2026 रोजी पाहिले.
  26. "सडक मिचेर राखिएका प्रहरी बिट हटाउन मेयर बालेन साहको निर्देशन". Online Khabar (इंग्रजी भाषेत). 30 July 2023 रोजी पाहिले.
  27. "'Textbook-free Friday' initiative welcomed but also doubted". kathmandupost.com (English भाषेत). 22 November 2024 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  28. "KMC directs private schools to distribute scholarships by mid-May". www.myrepublica.nagariknetwork.com (English भाषेत). 2024-08-08. 2026-01-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  29. Rajvanshi, Astha. "Time100 Next 2023". Time.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत