बालसाहित्य : आकलन आणि समीक्षा (ग्रंथ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बालसाहित्य : आकलन आणि समीक्षा हा विद्या सुर्वे बोरसे यानी लिहिलेला समीक्षाग्रंथ आहे. हा ग्रंथ शालेय विद्यार्थ्यांना समोर ठेवून लिहिला गेला आहे. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. मुलांसाठी लिहिला गेलेला हा मराठीतील पहिला समीक्षाग्रंथ आहे. [[रत्नागिरी जिल्हारत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या 'स्पर्श प्रकाशना'ने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.

या ग्रंथातील प्रकरणांना फेरी म्हटले आहे. ही ग्रंथजगताची फेरी आहे. प्रत्येक फेरीमध्ये आपणास बालसाहित्यातील महत्त्वाच्या पुस्तकांची ओळख करुन देण्यात आली आहे. एकूण सव्वीस फेऱ्यांमध्ये या ग्रंथाने विविध ग्रंथांचा परिचय करुन दिला आहे. ग्रंथाच्या अखेरीस परिशिष्ट जोडले आहे. या परिशिष्टामध्ये मुलांनी वाचली पाहिजेत अशा शंभर पुस्तकांची सूची देण्यात आली आहे.

ग्रंथामधील सव्वीस फेऱ्यांमधून लीलाधर हेगडे, बाबा भांड, अनंत भावे, माधुरी पुरंदरे, ज्योती कपीले, लक्ष्मीकांत देशमुख, नरेंद्र लांजेवार, स्वाती राजे, आबा गोविंदा महाजन, अनिल अवचट, अशोक पाटील,एकनाथ आव्हाड, ग. दि. माडगुळकर, चंद्रकांत खोत, दिलीप प्रभावळकर, पृथ्वीराज तौर, प्रतिमा इंगोले, मदन हजेरी, महावीर जोंधळे, मालविका देखणे, रा.ग. हर्षे, राजीव तांबे, रा.रं. बोराडे, सुभाष विभुते या लेखकांच्या पुस्तकांचा परिचय होतो.