बार्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?बार्डी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर करकंब
विभाग पुणे
जिल्हा सोलापूर
तालुका/के पंढरपूर
लोकसंख्या १,२०० (२०११)
भाषा मराठी

बार्डी,पंढरपूर तालुक्यातील एक १२०० लोकसंख्या असलेलं छोटसं गाव. नुकतीच गावाची आदर्श गाव योजनेत निवड झाली. गावामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने राहतात. गावालगत जवळ जवळ ३०० हेक्टर एवढी वनराई असूनसुद्धा पावसाच प्रमाण खूपच कमी आहे.[१] शेतीसाठी पूर्णता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारं,त्यामुळे कायम दुष्काळ-जन्य परीस्थिती असणारं हे गाव. मग या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गावातील सर्व शेतकरी ठीबक सिंचाकडे वळले आणि उन्हाळ्यात-सुद्धा शेतीला पाणी मिळावं म्हणून पुढं जाऊन सर्वांनी शेत-तळ्याची निर्मिती केली.

दळण वळण[संपादन]

बार्डी,पंढरपूर तालुक्याच्या उत्तरेला ३० किमी असणारं सीमेवरच हे गाव पण आजही गावामध्ये ST बसची सुविधा उपलब्ध नाहीं.

शिक्षणसुविधा[संपादन]

गावात जिल्हा परिषदेची सातवी पर्यतची शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी मुलांना तालुक्याला जावे लागते. यामुळे गळतीचे प्रमाण खूप आहे. अनेक वर्षांपासून पुढील व्यवस्था होण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. पण केवळ आश्वासने मिळत आहेत.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "बार्डीच्या वनात वन्यजीव प्राण्यांची ससेहोलपट". सकाळ दैनिक. २२ मे, इ.स. २०११ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ "जिल्ह्यात हव्यात आणखी 68 शाळा". सकाळ दैनिक. Archived from the original on 2016-03-05. १३ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)