Jump to content

बारामती विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बारामती विमानतळ
aerodrome
स्थापना1996 संपादन
याचे नावाने नामकरणबारामती संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानबारामती संपादन
भौगोलिक गुणक१८°८′४″N ७४°२१′१″E संपादन
Place served by transport hubबारामती संपादन
Map

बारामती विमानतळ हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील बारामती येथील छोटा विमानतळ आहे. हा विमानतळ बारामती शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. हा विमानतळ खाजगी विमाने आणि पायलट प्रशिक्षणासाठी वापरला जातो.

हा विमानतळ १९९६ मध्ये एमआयडीसीने बांधला.

१८२.५ हेक्टर (४५१ एकर) क्षेत्रफळाचा हा विमानतळ समुद्रसपाटीपासून ६०४ मीटर उंचीवर आहे. येथे एक धावपट्टी असून ती १,७७० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद आहे. याची आखणी ११/२९ अशी आहे. धावपट्टीच्या दोन्ही टोकांना विमाने परतण्यासाठी जागा आहे. विमानतळावर ११२ चौरस मीटरचे छोटे टर्मिनल आहे. येथे येण्यासाठी पक्का रस्ता आहे.

बारामती विमानतळावर वाहतूक नियंत्रक मिनारा असला तरी तेथे नियंत्रक नसतात. शेजारील अकादमी ऑफ कार्व्हर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्या फ्लाइट स्कूलमधील वरिष्ठ वैमानिक १२९.२५ मेगाहर्ट्झ रेडियोवर आसपासच्या हवाई क्षेत्रातील वाहतुकीचे निरीक्षण करतात आणि तेथे उडणाऱ्या वैमानिकांना सूचना देतात. [१]

अपघात आणि दुर्घटना

[संपादन]

१४ मार्च २००८ रोजी सेसना-१५२ प्रकारचे विमान (व्हीटी-एसीसी) विमानतळाच्या दक्षिणेस असलेल्या नीरा नदीत कोसळले. एक अनधिकृत महिला प्रवाशाला घेऊन एक विद्यार्थी वैमानिक एकट्यासाठी परवानगी असलेल्या प्रशिक्षण उड्डाणासाठी गेला असता गंमत म्हणून नदीवर ५० फूट उंचीपर्यंत आला होता. वैमानिकाला नदीवर पसरलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारा दिसल्या नाहीत आणि विमानाची मागची चाके त्यांत अडकून विमान नदीत कोसळले. दोन्ही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आणि विमानाचे मोठे नुकसान झाले. [२]

२८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी 8.45 वाजता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे एक लियरजेट ४५एक्सआर प्रकारचे विमान (व्हीटी-एसएसके) धावपट्टीवरून घसरले आणि त्यात स्फोट झाला. यात पवार आणि इतर चार ते पाच जण ठार झाले.[३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Airport website
  2. ↑ Airport website
  3. ↑ Airport website