बापूदेव सीताराम शास्त्री
Jump to navigation
Jump to search
सीतारामशास्त्रीं व सत्यभामा. त्यांच्या पोटी नृसिंह यांचाचा जन्म कार्तिक शुक्ल षष्ठी, रविवार विक्रमी संवत १८७६ म्हणजेच इ.स. २४ ऑक्टोबर १८१९ला झाला. त्यांना बापूदेव असेच म्हंटले जाऊ लागले. हे पुढे जाऊन संस्कृत पंडित झाले. पं. बापूदेव शास्त्रींनी संस्कृतमध्ये १२ ग्रंथ, हिंदीमध्ये ४ ग्रंथ तर इंग्रजीमध्ये २ ग्रंथ इ.स. १८५० ते १८७५ या काळात प्रसिद्ध केले.
ग्रंथ रचना[संपादन]
- सूर्यसिद्धांत : सोपपत्तिका - इंग्रजी भाषांतर लान मिलेट विल्किन्सन यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालच्या ‘बिब्लोथिका इंडिका’ ग्रंथमालेत टिपणींसहित प्रसिद्ध.
- गोलाध्याय - इंग्रजी अनुवाद प्रकाशित
ग्रंथ संपदा[संपादन]
- सरल त्रिकोणमिती
- सूर्यसिद्धांत- सोपपत्तिका
- फलितविचार,
- सायनवाद
- मानमंदिर- वर्णनम
- प्राचीन- ज्योतिषाचार्याशय- वर्णनम
- तत्त्वविवेक- परीक्षा
- विचित्र- प्रश्नसंग्रह: सोत्तर:
- अतुलयंत्रम्
- पंचक्रोशियात्रानिर्णयः
- नूतनपंचांगनिर्माणम
- पंचांगोपपादनम
- सिद्धांत शिरोमणि ग्रंथे चलगणितम.
हिंदी[संपादन]
- बीजगणितम्
- व्यक्तगणितम्
- भूगोलवर्णनम्
- खगोलसार:
इंग्लिश[संपादन]
- एलिमेंट्स ऑफ अरिथमेटिक दोन भाग,
- एलिमेंटस् ऑफ अलजिब्रा.
मानसन्मान[संपादन]
- लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीची मानद सदस्यता
- ले. गव्हर्नर सर विलीयम म्युअर प्रयाग येथे किमती रेशमी वस्त्र व एक सहस्र मुद्रा देऊन सन्मानित
- कोलकाता विश्वविद्यालयाचे मानद सदस्यत्व
- काश्मीर महाराजांनी इ.स. १८७३ मध्ये त्यांना पश्मीनाची महागडी शाल व एक सहस्र मुद्रा देऊन गौरवान्वित (सूर्य व चंद्रग्रहणाची निर्धारित केलेली वेळ)
- १८७५ मध्ये काशीनरेश पश्मीनाची महागडी शाल व एक सहस्र मुद्रा देऊन गौरवान्वित (नूतन पंचांगाची सुरुवात)
- इ.स. १८८७ ‘महामहोपाध्याय’ पदवी