बाणगंगा पाणी वाटप (इ.स.१६७४)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पाणीवाटपाचा ऐतिहासिक निवाडा[संपादन]

१६७४ साली नाशिक जिल्ह्यातील एका महजरामध्ये (ऐतिहासिक कागदपत्रामध्ये) दिंडोरी परगण्यातील मोहोडी या गावाच्या लोकांनी बाणगंगा नदीवर धरण बांधून आपल्या गावी बागाईत करावयाचे ठरविले .तेव्हा काय झाले याचे हे वर्णन आहे.

या लोकांनी कामास सुरुवात केल्यावर शेजारच्या जाणोरी गावाच्या पाटलाने यास हरकत घेतली. त्याचे म्हणणे होते येथे बांध घातल्यास आपल्या गावाच्या बांधास पाणी कमी होईल. बाणगंगा नदी मोहोडीच्या बाहेरून जात होती. तिथे विहिरी होत्या पण पाऊसमान कमी असल्याने पाणी टिकत नसे.शेतीचे नुकसानी होई. त्यामुळे मुबलक पाणी असलेल्या बाणगंगेवर धरण बांधून पाणी आपल्याकडे वळवावे असे त्यांना वाटे. मोहोडीकर म्हणत ,"कुदरती नदी जमीन आसमान आहे ते पासून आहे, आणि बांधारे तरी हर कोन्ही हिमती धरून करितात हे सुदामद तमाम दुनियामध्ये खर्ज आहे. येसियास साहेबी इन्साफ करून आपणास बांद बांधावयाचा हुकूम केला पाहिजे, निसर्गाचे खैरात सर्वांना खुली असावयास पाहिजे."

शेवटी हा तंटा मजलसीपुढे नेण्यात आला.नाशिक, दिंडोरी व वाणी या तिन्ही परगण्याचे मुत्सद्दी जमीनदार हजर होते. त्यांनी सर्व पाहणी करून निकाल दिला,"हे जागा बंधारीया ल्याख आहे,मेहनत बहुत आहे,टका खर्च होईल.अमा पाणी पोहचेल.जे कुदराती नदी आहे हर कोन्ही पाणी नेईल त्यास मना नाही.त्यामुळे या नदीवर बांध घातल्यास कोणाचे नुकसान होणार नाही.तसेच मुठ्मर्दी करून कोणी या कामास अडथळा करेल तर त्यापासून गावकरयाना संरक्षण देण्यात येईल." या प्रकारे अधिक जमीन पाण्याखाली आली व सरकारला फायदा झाला.[१]

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ इतिहास संशोधन मंडळ - जुनी कागदपत्रे