बांबू इंडिया
बांबू इंडिया ही भारतातील एक आघाडीची बांबू उत्पादन आणि प्रक्रिया स्टार्टअप[मराठी शब्द सुचवा] कंपनी असून त्यांचे मुख्यालय पुणे येथे आहे. शाश्वत आणि पर्यावरणपूरक बांबू उत्पादने तयार करण्यावर कंपनीचा भर आहे. बांबूच्या विविध उपयोगांना प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.[१]
प्रकार | स्टार्टअप कंपनी |
---|---|
उद्योग क्षेत्र | बांबू उद्योग |
स्थापना | १५ ऑगस्ट २०१६ |
संस्थापक | योगेश शिंदे, अश्विनी शिंदे |
मुख्यालय | पुणे |
उत्पादने | टूथ ब्रश, मोबाईल स्टॅन्ड, स्पीकर,बांबू पेन, पेन्सिल, पाण्याची बाटली, कॉफी मग |
संकेतस्थळ |
bambooindia |
इतिहास
[संपादन]बांबू इंडिया या कंपनीची स्थापना २०१६ या वर्षी झाली असून योगेश शिंदे आणि अश्विनी शिंदे हे बांबू इंडिया कंपनीचे संस्थापक आहेत.[२] भारत हा बांबू उत्पादनात जगात दोन क्रमांकाचा देश असून बांबूची लागवड आणि प्रक्रिया ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे या उद्योगातून ग्रामीण लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच दैनंदिन जीवनातील प्लास्टिकचा वापर कमी करून लोकांना बांबू पासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.
२०२२ या वर्षी बांबू इंडियाचे संस्थापक योगेश शिंदे आणि अश्विनी शिंदे हे सेट इंडियावर प्रसारित होणाऱ्या भारतीय व्यावसायिक वास्तव दूरचित्रवाणी मालिका शार्क टँक इंडिया या कार्यक्रमात सहभागी झाले होते.[३][४]
उत्पादने
[संपादन]पुण्यातील बांबू इंडिया ही कंपनी दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा उपयोग होत असलेल्या ठिकाणी प्लास्टिक ऐवजी बांबूपासून तयार केलेल्या वस्तू बनवत आहे.[५] लहान मुले तसेच प्रौढ लोकांसाठी टूथ ब्रश, मोबाईल स्टॅन्ड, स्पीकर, बांबू पासून बनवलेली राखी, टंग क्लीनर, कंगवा, कान साफ करण्यासाठीचे ईअर बड्स, स्ट्रॉ, रेझर, बांबू पेन, पेन्सिल, पाण्याची बाटली, कॉफी मग, वही इत्यादी प्रकारच्या गोष्टी बनवत ही कंपनी प्लास्टिकला पर्याय शोधत आहे.[६]
कंपनीची सर्व उत्पादने ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, बांबू इंडियाचे संकेतस्थळ आणि इतर अनेक ऑनलाईन संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.[७] नीती आयोगाच्या संकेतस्थळावर बांबू इंडिया बाबत संपूर्ण माहिती दिली आहे.[८]
सामाजिक योगदान
[संपादन]बांबू इंडियाने बांबूशी निगडित इको-फ्रेंडली उत्पादने तयार करत आतापर्यंत जवळपास २० लाख किलो पेक्षा जास्त प्लास्टिक नष्ट केले आहे. तसेच प्लास्टिकच्या वस्तूंना बांबूने बदलण्याच त्यांचं उद्दिष्ट आहे.[९] २०२५ पर्यंत नाविन्यपूर्ण बांबू उत्पादनांचा वापर करून जगभरातील १० लाख किलो प्लास्टिक कचरा कमी करणे हे बांबू इंडियाचे ध्येय आहे. बांबू इंडिया या स्टार्टअपने आत्तापर्यंत ४००० शेतकऱ्यांना रोजगार देखील दिला आहे.[३]
पुरस्कार
[संपादन]२०१८ - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संयुक्त राष्ट्राकडून बांबू इंडियाने केलेल्या कामाचे कौतुक[१०]
संदर्भ
[संपादन]- ^ Patwardhan, Aditi (2017-01-18). "Bamboo's Boon: This Entrepreneur's Mission Is to Reduce Plastic Waste & Make Farmers Independent!". The Better India (इंग्रजी भाषेत). 2025-03-18 रोजी पाहिले.
- ^ "Bamboo India - A Bootstrapped Ecommerce Startup Based Out Of Pune". Datalabs (इंग्रजी भाषेत). 2025-03-18 रोजी पाहिले.
- ^ a b Bharat, E. T. V. (2022-02-21). "Bamboo India : पुण्यातील 'बांबू इंडिया' पोहचले Shark Tank India कार्यक्रमात, वाचा स्पेशल रिपोर्ट!". ETV Bharat News. 2025-03-18 रोजी पाहिले.
- ^ Khush (2023-11-10). "Is Bamboo India out of business after Shark Tank India?" (इंग्रजी भाषेत). 2025-03-18 रोजी पाहिले.
- ^ Bharat, E. T. V. (2024-10-06). "ऊना के अजय ने बनाया कमाल का टूथब्रश, चावल के रेशों से बना बैंबू ब्रश मुंह की सफाई को बनाता है आसान - Eco Friendly Bamboo Toothbrush". ETV Bharat News (हिंदी भाषेत). 2025-03-18 रोजी पाहिले.
- ^ वर्मा, विकास (2020-12-06). "खुद्दार कहानी: नौकरी छोड़ शुरू किया बैंबू इंडिया स्टार्टअप ताकि प्लास्टिक का यूज कम हो, 3 साल में 3.8 करोड़ पहुंचा टर्नओवर" (हिंदी भाषेत).
- ^ "Bamboo India Bamboo Toothbrush with pack of 4 pieces Medium Bristles with antibacterial and biodegradable Bamboo Handle Medium Toothbrush - Buy Baby Care Products in India | Flipkart.com". Flipkart.com (इंग्रजी भाषेत). 2025-03-18 रोजी पाहिले.
- ^ "Bamboo India" (PDF). NITI Aayog.
- ^ "Innovative Pune Businessman Creates Cycle Made Out Of Bamboo That Weighs Only 2 Kgs". Indiatimes (इंग्रजी भाषेत). 2017-11-25. 2025-03-18 रोजी पाहिले.
- ^ "Pune-based startup among 15 firms at UN Environment Day global celebrations". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-06-05. 2025-03-18 रोजी पाहिले.