बांगलादेश क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२५
Appearance
| बांगलादेश क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२५ | |||||
| तारीख | १७ – २१ मे २०२५ | ||||
| संघनायक | मुहम्मद वसीम | लिटन दास | |||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | संयुक्त अरब अमिराती संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | मुहम्मद वसीम (१४५) | तांझिद हसन (१०९) | |||
| सर्वाधिक बळी | मुहम्मद जवादुल्लाह (७) | तंझीम हसन साकिब (४) | |||
| मालिकावीर | मुहम्मद वसीम (युएई) | ||||
बांगलादेश पुरुष क्रिकेट संघाने मे २०२५ मध्ये संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय संघाविरुद्ध खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[२][३] हे सामने शारजा येथील शारजा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आले.[४] मे २०२५ मध्ये, अमिराती क्रिकेट बोर्डाने (ECB) मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले.[५] या मालिकेत सुरुवातीला फक्त दोन सामने नियोजित होते, परंतु पहिल्या सामन्यानंतर मालिकेत तिसरा सामना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.[६][७]
संयुक्त अरब अमिरातीने मालिका २–१ ने जिंकली.[८][९] संयुक्त अरब अमिरातीचा पूर्ण सदस्य संघावरचा हा दुसरा मालिका विजय होता तर बांगलादेशचा असोसिएट सदस्य संघाविरुद्धचा तिसरा मालिका पराभव होता.[१०]
संघ
[संपादन]
|
आं.टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हैदर अली, मतीउल्लाह खान आणि मुहम्मद जोहैब (युएई) ह्या सर्वांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- परवेझ हुसेन इमॉनने (बां) आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्याचे पहिले शतक झळकावले.[१३]
- परवेझ हुसेन इमॉनने बांगलादेशसाठी पुरुषांच्या टी२० मध्ये एका डावात (९) सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडला आणि रिशाद हुसेन (७) ला मागे टाकले.[१४] त्याने बांगलादेशसाठी पुरुषांच्या टी२० मध्ये एका डावात चौकारांनी सर्वाधिक (७४) धावा करण्याचा विक्रमही मोडला, तमीम इक्बाल (७०) ला मागे टाकले.[१५]
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- साघिर खान (युएई) आणि नाहिद राणा (बां) ह्या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- पुरुषांच्या टी२० मध्ये बांगलादेशविरुद्ध संयुक्त अरब अमिरातीचा हा पहिलाच विजय होता.[१६]
३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- एथन डिसोझाने (युएई) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "UAE welcome Bangladesh for T20I series ahead of Pakistan tour" [पाकिस्तान दौऱ्यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी२० मालिकांसाठी युएईने बांगलादेशचे स्वागत केले]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh set for UAE detour before Pakistan tour" [पाकिस्तान दौऱ्यापूर्वी बांगलादेश युएईच्या वळणावर जाणार.]. क्रिकबझ्झ. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "UAE vs Bangladesh: Additional T20I to be played on May 21" [युएई विरुद्ध बांगलादेश: २१ मे रोजी अतिरिक्त टी२० सामना खेळवला जाईल]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh to play two T20Is against UAE in Sharjah before Pakistan tour" [पाकिस्तान दौऱ्यापूर्वी बांगलादेश शारजामध्ये यूएईविरुद्ध दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh to play two T20Is against UAE in Sharjah later this month" [या महिन्याच्या अखेरीस शारजा येथे बांगलादेश युएई विरुद्ध दोन टी२० सामने खेळणार आहे.]. Emirates Cricket Board. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "UAE to play Bangladesh in one additional T20I match on Wednesday, 21 May" [२१ मे, बुधवारी बांगलादेशविरुद्ध एक अतिरिक्त टी२० सामना खेळणार.]. अमिराती क्रिकेट बोर्ड. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Tigers' ongoing UAE tour extends to three T20Is" [टायगर्सचा सध्याचा यूएई दौरा तीन टी२० सामन्यांसाठी वाढला आहे.]. द डेली स्टार. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "UAE create history in Sharjah, down Bangladesh for first-ever T20I Series triumph" [शारजामध्ये युएईने इतिहास रचला, बांगलादेशला हरवून पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० मालिका विजय मिळवला.]. द टाइम्स ऑफ इंडिया. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "UAE bask in glory of historic T20 series victory over Bangladesh in Sharjah" [शारजामध्ये युएईने घेतला बांगलादेशवर ऐतिहासिक टी-२० मालिका विजयाचा आनंद.]. द नॅशनल. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Haider's miserly spell and a record chase in UAE's series win" [युएईच्या मालिका विजयात हैदरची जादुई गोलंदाजी आणि विक्रमी पाठलाग]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Muhammad Waseem to lead UAE in two-match T20I Series against Bangladesh" [मुहम्मद वसीम बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये यूएईचे नेतृत्व करणार]. अमिराती क्रिकेट बोर्ड. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Litton Das named Bangladesh T20I captain; महेदी हसन to be his deputy" [लिटन दास बांगलादेशचा आं.टी२० कर्णधार; महेदी हसन उपकर्णधार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "UAE vs BAN: Parvez Hossain Emon joins Virat Kohli in elite club with 53-ball century" [युएई विरुद्ध बांगलादेश: परवेझ हुसेन इमॉन ५३ चेंडूत शतक झळकावून एलिट क्लबमध्ये विराट कोहलीला सामील झाला]. इंडिया टुडे. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "UAE v Bangladesh: Waseem laments batting collapse but remains positive ahead of second T20I" [युएई विरुद्ध बांगलादेश: फलंदाजी कोसळल्याबद्दल वसीम दु:खी, पण दुसऱ्या टी२०पूर्वी सकारात्मक]. द नॅशनल. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Parvez Hossain Emon elated to surpass idol Tamim Iqbal's record" [परवेझ हुसेन इमॉनला, आदर्श तमीम इक्बालचा विक्रम मोडण्याचा आनंद]. क्रिकबझ्झ. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Waseem and UAE make history after acing 206 chase against Bangladesh" [बांगलादेशविरुद्ध २०६ धावांचा पाठलाग करून वसीम आणि यूएईने इतिहास रचला]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.

