बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२५
Appearance
| बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२५ | |||||
| तारीख | १७ जून – १६ जुलै २०२५ | ||||
| संघनायक | धनंजय डी सिल्वा (कसोटी) चरिथ असलंका (आं.ए.दि. आणि आं.टी२०) |
नजमुल हुसैन शान्तो (कसोटी) मेहेदी हसन मिराझ (आं.ए.दि.) लिटन दास (आं.टी२०) | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | पथुम निसंका (३६९) | नजमुल हुसैन शान्तो (३००) | |||
| सर्वाधिक बळी | थरिंदू रत्नायके (९) | नयीम हसन (९) तैजुल इस्लाम (९) | |||
| मालिकावीर | पथुम निसंका (श्री) | ||||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | कुशल मेंडिस (२२५) | परवेझ हुसेन इमॉन (१०८) | |||
| सर्वाधिक बळी | वनिंदु हसरंगा (९) | तन्वीर इस्लाम (७) | |||
| मालिकावीर | कुशल मेंडिस (श्री) | ||||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | पथुम निसंका (१२०) | लिटन दास (११४) | |||
| सर्वाधिक बळी | बिनुरा फर्नांडो (३) महीश थीकशाना (३) |
महेदी हसन (४) रिशाद हुसेन (४) | |||
| मालिकावीर | लिटन दास (बां) | ||||
बांगलादेश क्रिकेट संघ जून आणि जुलै २०२५ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करत आहे.[१] या दौऱ्यात दोन कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले जातील.[२][३] कसोटी मालिका ही २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती.[४] मे २०२५ मध्ये, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले.[५] २८ जून २०२५ रोजी, श्रीलंकेविरुद्ध १-० अशा पराभवानंतर नजमुल हुसैन शान्तो बांगलादेश कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला.[६]
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१७–२१ जून २०२५
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- दुसऱ्या दिवशी पावसामुळे केवळ ६१ षटकांचा खेळ होऊ शकला.
- लाहिरू उदारा आणि थरिंदू रत्नायके (श्री) ह्या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- पथुम निसंका (श्री) कसोटी क्रिकेटमध्ये १,००० धावांच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आणि त्याने घरच्या मैदानावर पहिले कसोटी शतक केले. त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याची सर्वोच्च वैयक्तिक कसोटी धावसंख्या देखील गाठली.[७]
- नजमुल हुसैन शान्तो हा कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके करणारा पहिला बांगलादेशी कर्णधार ठरला.[८]
- अँजेलो मॅथ्यूजचा (श्री) हा शेवटचा कसोटी सामना होता.[९][१०]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: श्रीलंका ४, बांगलादेश ४.
२री कसोटी
[संपादन]२५–२८ जून २०२५
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ७१ शतकांचा खेळ शक्य झाला.
- सोनल दिनुशाने (श्री) कसोटी पदार्पण केले.
- लिटन दास (बां) त्याचा ५०वा कसोटी सामना खेळला[१२] आणि त्याने बांगलादेशसाठी कसोटी क्रिकेटमध्ये मुशफिकर रहिम ला मागे टाकून यष्टीरक्षकाद्वारे सर्वाधिक गडी बाद करण्याचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.[१३]
- विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण: श्रीलंका १२, बांगलादेश ०.
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मिलन रथनायके (श्री), परवेझ हुसेन इमॉन आणि तन्वीर इस्लाम (बां) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- वनिंदु हसरंगाने (श्री) त्याचा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय बळी मिळविला.[१४]
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- तौहीद ह्रिदोयने (बां) एकदिवसीय सामन्यात त्याच्या १००० धावा पूर्ण केल्या.[१५]
- तन्वीर इस्लामने (बां) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी घेतले.[१६]
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- महेदी हसनने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्याचा ५०वा बळी घेतला
नोंदी
[संपादन]- ^ सामन्याच्या पहिल्या दिवशी ॲलेक्स व्हार्फची जागा प्रगीथ राम्बुकवेल्ला यांनी घेतली आणि त्यावेळी त्यांनी पंच म्हणून कसोटी पदार्पण केले.[११]
संदर्भयादी
[संपादन]- ^ "Bangladesh to visit Sri Lanka for an all-format tour beginning June" [जूनपासून बांगलादेश सर्व स्वरूपाच्या दौऱ्यासाठी श्रीलंकेला जाणार.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh set for all format tour of Sri Lanka in June 2025" [जून २०२५ मध्ये बांगलादेश सर्व स्वरूपाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज]. क्रिकबझ्झ. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka to host an all-format international series against Bangladesh" [श्रीलंका बांगलादेशविरुद्ध सर्व स्वरूपाची आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित करणार.]. क्रिकट्रॅकर. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh to make all-format tour of Sri Lanka in June-July" [बांगलादेश जून-जुलैमध्ये श्रीलंकेचा सर्व स्वरूपाचा दौरा करणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh Tour of Sri Lanka 2025 | Schedule" [बांगलादेशचा श्रीलंका दौरा २०२५ | वेळापत्रक]. श्रीलंका क्रिकेट. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Shanto steps down as Bangladesh Test captain after series loss against Sri Lanka" [श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर शांतोने दिला बांगलादेशच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "SL vs. BAN 1st Test: Pathum Nissanka hits 3rd Test century" [श्रीलंका विरुद्ध बांगलादेश पहिली कसोटी: पथुम निसंकाने तिसरे कसोटी शतक ठोकले]. अडा देराना. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "HISTORY! Bangladesh captain Najmul Hossain Shanto registers a big record against Sri Lanka in Galle" [इतिहास! बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शान्तोने गाले येथे श्रीलंकेविरुद्ध मोठा विक्रम नोंदवला]. टाइम्स ऑफ इंडिया. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka's Mathews to retire from Test cricket" [श्रीलंकेचा मॅथ्यूज कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार]. बीबीसी स्पोर्ट. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "'Time for me to say goodbye' - Angelo Mathews to retire from Test cricket" ['माझा निरोप घेण्याची वेळ आली आहे' - अँजेलो मॅथ्यूज कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Fourth Umpire to Field Umpire- Rambukwella's rare debut" [चौथे पंच ते मैदानावरील पंच - राम्बुकवेल्ला दुर्मिळ पदार्पण]. डेली न्यूज (श्रीलंका). १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ প্রতিবেদক, ক্রীড়া (२५ जून २०२५). "লিটনের ৫০তম টেস্ট, যেতে পারবেন কত দূর" [लिटनची ५० वी कसोटी, तो किती पुढे जाऊ शकतो?]. प्रोथोमालो (Bengali भाषेत). १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Most dismissals for Bangladesh in Tests" [बांगलादेशकडून कसोटीत सर्वाधिक बळी]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Wanindu Hasaranga becomes second-fastest Sri Lankan to take 100 wickets in ODI cricket" [वनिंदु हसरंगा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी घेणारा दुसरा श्रीलंकेचा खेळाडू ठरला.]. राजस्थान रॉयल्स. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "तौहीद ह्रिदोय Becomes Joint-Second Fastest Bangladesh Batter To 1000 ODI Runs" [तौहीद ह्रिदोय बांगलादेशचा सर्वात जलद १००० एकदिवसीय धावा करणारा संयुक्त दुसरा फलंदाज ठरला.]. क्रिकेट वन. ५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Tanvir Islam's Maiden 5-Wicket Haul Helps B'desh Secure 16-Run Win In 2nd ODI" [तन्वीर इस्लामच्या पहिल्या ५ विकेटमुळे बांगलादेशने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १६ धावांनी विजय मिळवला.]. न्यूज१८. ५ जुलै २०२५ रोजी पाहिले.

