बळवंत लिमये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


बळवंत लिमये (१८८० - १९६१) हे स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवासाची शिक्षा झालेले सोलापूरमधील पत्रकार होते.[१] लिमये यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील ईंडी तालुक्यातील भतकूणकी गावात वतनदार घराण्यात १८८० साली झाला.

कार्य[संपादन]

लिमये हे 'गजनफर' कार अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचे प्रेरक, तर लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत संघटनेचे सदस्य होते. त्यांनी धोका पत्करुन सावरकरांच्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकाची छपाई केली. याद्वारे त्यांनी सोलापुरात छपाईला प्रारंभ केला होता. याशिवाय लिमये अल्पकाळ जगलेल्या स्वराज्य' साप्ताहिकाचेही संपादक होते. [२]

त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. लाठी,दांडपट्टा फिरवणे आणि कुस्ती अशा मर्दानी खेळांची त्यांना विशेष आवड होती. १९०४ साली बी.ए झाल्यानंतर त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव यांसारख्या सार्वजनिक आणि सामाजिक कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली.ही सुरुवात त्यांचा आतेभाऊ अप्पासाहेब फाटक यांच्यामुळे झाली. टिळकांच्या राष्ट्रीय विचारसरणीची छाप त्यांच्यावर पडल्यामुळे त्यांनी राजकीय चळवळीत भाग घेतला. टिळकांबरोबर त्यांचा वैयक्तिक परिचयही वाढू लागला. टिळकांनी लिमये यांची निर्भयता पाहून त्यांना 'राष्ट्रीय कार्याच्या उत्तेजनार्थ वृत्तपत्रांची गरज आहे' असे सांगून स्वराज्य साप्ताहिक काढण्यास उत्तेजन दिले. १९०७ साली चैत्र शुद्ध प्रतिपदेला राष्ट्रीय बाण्याचे,तडफदार आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे 'स्वराज्य' हे साप्ताहिक बळवंतराव लिमये यांच्या संपादकत्वाखाली सोलापुरातून सुरु झाले. सायन्ना नरसू गानला यांच्या दत्तप्रसाद छापखान्यात ते छापले जाई.

संदर्भ[संपादन]

  1. ^ श्रीधर, विजयदत्त (2008). भारतीय पत्रकारिता कोश (हिंदी भाषेत). वाणी प्रकाशन. ISBN 978-81-8143-750-1.
  2. ^ लेले, रा.के. (१९७४). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉंटिनेंटल प्रकाशन.