Jump to content

बल्लाळ (भोकर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?बल्लाळ
बल्हाळ
महाराष्ट्र  भारत
  महसुली गांव/ गट ग्रामपंचायत  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर भोकर, म्हैसाउमरी
जिल्हा नांदेड जिल्हा
लोकसंख्या २,५२३ (२०११)
भाषा मराठी
सभापती मारोतराव‌ बल्लाळकर
बोलीभाषा मराठी, तेलुगु, गोरमाटी
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२४६२
• MH २६

बल्लाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

महाराष्ट्र-तेलंगणा सीमारेषेपासुन १३ का.मी. अंतरावर

ईतिहास

[संपादन]

महाराष्ट्रभर केवळ नव्हे तर त्या बाहेरच्या विस्तृत प्रदेशावर राज्य करणारे हे यादवांचे घराणे, महाराष्ट्र महोदयाच्या इतिहासाच्या उषःकाली सातवाहनांचे साम्राज्य जेवढ्या मह्त्वाचे होते तेवढेच प्रचीन काळच्या शेवटी या यादव घराण्याचे महत्त्व होते. सहाजिकच संपूर्ण नांदेड परिसर त्यांच्या अधिपत्याखाली होता. पाचव्या भिल्लमने देवगिरी हे नगर वसलिले आणि तेथे आपली राजधानी हलविली. तेव्हापासून मराठवाडा महत्वाचा ठरला. कृष्णेच्या उत्तरेकडील सारे राज्य, याच्या ताब्यात होते.

रट्ट घराण्याच्या बल्लाळाची अमर्दकपूर (औंढा जि.हिंगोली) येथे राजधानी होती आणि उपराजधानी होती अराध्यपूर (अर्धापूर जि.नांदेड) येथे, या ठिकाणी बल्लाळाचा सेनापती चालुक्य याचा निवास असे.

हवामान

[संपादन]

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

[संपादन]

बंजारा (लमाणी),कोळी,मराठा,भिल्ल-नायकपोडू, लिंगायत वाणी,गोलावार, ब्राह्मण , बौद्ध, कुंभार, मुस्लिम, सुतार, लोहार, कोमटी, मातंग इत्यादी..

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]
  • इच्छापूर्ती मंदिर

नागरी सुविधा

[संपादन]
  • सभामंडप

जवळपासची गावे

[संपादन]
  • पिंपळडोह
  • मातुळ
  • पोमनाळा
  • म्हैसूर नगर
  • मोखांडी
  • मोघाळी
  • धारजनी

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.