Jump to content

बर्गन-बेल्सन छळछावणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्गन-बेल्सन छळछावणीच्या प्रवेशद्वाराजवळील स्मारक दगड

बर्गन-बेल्सन (किंवा बेल्सन) ही एक नाझी छळछावणी होती. ती आत्ताच्या लोअर सॅक्सोनी, जर्मनीमधील बर्गन गावाच्या नैऋत्य दिशेला स्थापित करण्यात आली होती. मुळात युद्धबंद्यांसाठी बनवलेली ह्या छावणीतील काही भाग इ.स. १९४३मध्ये छळछावणीत रूपांतरित करण्यात आला. सुरुवातीला ही छावणी युद्धबंद्यांच्या देवाणघेवाणीसाठी बनवली होती. येथील ज्यू कैद्यांना देऊन इतर देशातील जर्मन सैनिकांना सोडवता यावे असा यामागे उद्देश होता. [] काळांतराने छावणीचा विस्तार करून इतर छावण्यांमधील ज्यूंना इथे आणण्यात आले.

इ.स. १९४१ ते इ.स. १९४५ दरम्यान जवळजवळ २०,००० रशियन युद्धकैदी व इतर ५०,००० कैदी इथे मरण पावले.[] यातील सुमारे ३५,००० इ.स. १९४५ च्या प्रलापक ज्वराच्या साथीतच मरण पावले होते.[]

या छावणीची मुक्तता दिनांक १५ एप्रिल, इ.स. १९४५ रोजी ब्रिटिश सशस्त्र सैन्याच्या ११व्या चिलखती दलाने केली.[] त्यांना छावणीत सुमारे ५३,००० कैदी सापडले. त्यातील बहुतांशी सर्वजणच उपाशी व गंभीररित्या आजारी होते.[] त्यांना जवळजवळ १३,००० न पुरलेले मृतदेहही आढळले.[] या छावणीतील भयावहता अनेक छायाचित्रांमधून व माहितीपटातून पाश्चात्य जगतात पसरली गेली व बेल्सन हे नावच नाझी जर्मनीच्या क्रुरतेचे प्रतिक मानले गेले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ शेफर्ड, बेन. आफ्टर डेब्रेक: द लिबरेशन ऑफ बेल्सन, १९४५ (इंग्लिश: After daybreak : the liberation of Belsen, 1945).
  2. ^ ओपनहायमर, पॉल. फ्रॉम बेल्सन टू बकिंगहम पॅलेस(इंग्लिश: From Belsen to Buckingham Palace).
  3. ^ a b "बर्गन-बेल्सन", अमेरिकेतील होलोकॉस्ट स्मारक संग्रहालय (इंग्लिश: United States Holocaust Memorial Museum)
  4. ^ a b ११वे ब्रिटिश सशस्त्र सैन्य दल, अमेरिकेतील होलोकॉस्ट स्मारक संग्रहालय.