बरसात (१९४९ चित्रपट)
1949 film by Raj Kapoor | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार | |||||
|---|---|---|---|---|---|
| गट-प्रकार |
| ||||
| मूळ देश | |||||
| संगीतकार | |||||
| पटकथा | |||||
| निर्माता | |||||
| Performer | |||||
| वितरण |
| ||||
| दिग्दर्शक | |||||
| प्रमुख कलाकार | |||||
| प्रकाशन तारीख |
| ||||
| कालावधी |
| ||||
| |||||
बरसात हा १९४९ मध्ये प्रदर्शित झालेला राज कपूर दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात कपूर आणि नर्गीस दत्त ही प्रसिद्ध जोडी तसेच प्रेम नाथ यांच्या भूमिका आहेत. हा अभिनेत्री निम्मीचा पहिला चित्रपट होता. बरसात हा कपूर दिग्दर्शित पहिल्या मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक होता. या यशामुळे कपूर यांना १९५० मध्ये आर.के. स्टुडिओ खरेदी करता आला. आग (१९४८) नंतर कपूरचा हा दुसरा दिग्दर्शनात्मक चित्रपट होता. बरसात हा चित्रपट रिलीजच्या वेळी सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आणि त्याने ज्ञान मुखर्जीच्या ६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या किस्मतला मागे टाकले.
कथानक
[संपादन]हा चित्रपट दोन प्रेमकथांभोवती फिरतो. प्राण (राज कपूर) व रेश्मा (नर्गिस) आणि गोपाल (प्रेम नाथ) व नीला (निम्मी). श्रीमंत पण संवेदनशील प्राण आणि फूस लावणारा गोपाळ हे दोघेही काश्मीर खोऱ्यात सुट्टी घालवत असताना दोन डोंगरी मुलींशी प्रेमसंबंध निर्माण करतात.[१] प्राण आणि रेश्माचे प्रेम खरे आणि परस्परपूरक आहे, तर गोपाळ हा एक खलनायक आहे, जो विश्वासू नीलाकडे दुर्लक्ष करतो आणि तिला बरसात (पावसाळा) मध्ये परतण्याचे वचन देऊन वाट पाहण्यास सांगतो.
प्रेमाच्या मार्गावर प्राण आणि रेश्मा यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, ज्यामध्ये पालकांचा विरोध, अपघात आणि रेश्माचे एका निर्दयी मच्छीमारासोबत जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न यांचा समावेश होतो. हे जोडपे अखेर पुन्हा एकत्र येते.
दुसरीकडे, गोपाळ शेवटी एक सुधारित पात्र बनतो आणि नीलाला मिळवण्यास जातो; जी खूप थकली होती असते. तिथे पोहोचल्यावर त्याला कळते की ती मरण पावली आहे. शेवटी पाऊस पडत असताना गोपाळ नीलाच्या चितेला अग्नी देतो आणि चित्रपटाचा शेवट होतो.
संगीत
[संपादन]बरसात चित्रपटाचे संगीत प्रसिद्ध झाले. हा चित्रपट संगीत दिग्दर्शक शंकर-जयकिशन यांचा पहिला चित्रपट होता आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला बळकटी दिली. प्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी बरसात मध्ये नर्गिस आणि निम्मी दोघांसाठीही गाणे गायले होते. "हवा में उडता जाये" या गाण्यात अभिनेत्री बिमला कुमारी डोलताना दिसते, हे गाणे खूप लोकप्रियही झाले. प्लॅनेट बॉलीवूडने त्यांच्या १०० सर्वोत्कृष्ट बॉलीवूड साउंडट्रॅकच्या यादीत या साउंडट्रॅकला पहिल्या क्रमांकावर सूचीबद्ध केले होते.[२] प्लॅनेट बॉलीवूडचे राकेश बुधू यांनी "बरसात हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम साउंडट्रॅकपैकी एक आहे" असे म्हणत १० स्टार दिले.[३]
सर्व गीतांचे संगीतकार आहे शंकर-जयकिशन.
| क्र. | शीर्षक | गीतकार | गायक | अवधी |
|---|---|---|---|---|
| १. | "हवा में उडता जाए" | रमेश शास्त्री | लता मंगेशकर | 2:30 |
| २. | "जिया बेकरार है" | हसरत जयपुरी | लता मंगेशकर | 3:10 |
| ३. | "बरसात में हमसे मिले" | शैलेंद्र | लता मंगेशकर | 5:00 |
| ४. | "मुझे किसी से प्यार हो गया" | जलाल मलिहाबादी | लता मंगेशकर | 2:46 |
| ५. | "मेरी आंखोमें बस गया कोई रे" | हसरत जयपुरी | लता मंगेशकर | 2:47 |
| ६. | "पतली कमर है" | शैलेंद्र, धाकरिया अखिलेश | लता मंगेशकर, मुकेश | 5:17 |
| ७. | "मै झिंदगी में हरदम रोता ही रहा" | हसरत जयपुरी | मोहम्मद रफी | 2:51 |
| ८. | "अब मेरा कैन सहारा" | हसरत जयपुरी | लता मंगेशकर | 3:15 |
| ९. | "छोड गए बालम" | हसरत जयपुरी | लता मंगेशकर, मुकेश | 4:28 |
| १०. | "बिछडे हुए परदेसी" | हसरत जयपुरी | लता मंगेशकर | 3:28 |
| ११. | "जिया बेकरार है" | वाद्य | 2:29 | |
एकूण अवधी: |
38:01 | |||
संदर्भ
[संपादन]- ↑ "Shah Rukh Khan in Kashmir for shooting of 'Dunki'".
- ↑ "100 Greatest Bollywood Soundtracks Ever – Part 4". Planet Bollywood. 6 March 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 March 2011 रोजी पाहिले.
- ↑ "Barsaat Music Review by Rakesh Budhu". Planet Bollywood. 7 February 2012 रोजी पाहिले.