Jump to content

बटाटा वडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बटाटेवडा
Indian fast food
उपवर्गpotato dish संपादन
मूळ देशभारत संपादन
वापरलेली सामग्रीबटाटा संपादन
Coursehors-d'œuvre संपादन
वडापाव
वडापाव

बटाटावडा किंवा बटाटेवडा हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे.

बटाटेवडा हा तेलात तळलेला खाद्यपदार्थ आहे. तो दिसायला गोलाकार असतो. त्याचे वरचे आवरण हे द्रवरूप डाळीच्या पिठाचे असते (जे तळल्यावर घट्ट होते), व आतमध्ये उकडलेल्या व फोडणी दिलेल्या बटाट्यांचे मसालायुक्त मिश्रण असते. या वड्याला इंडियन बर्गर असे सुद्धा म्हणतात.

वडा-पाव या खाद्यपदार्थातील वडा हा प्रमुख घटक म्हणजे बटाटेवडाच होय.

वडा-पावच्या गाडीवर महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचा रोजगार चालतो. महाराष्ट्रातात रोजगारासाठी आलेले अनेक गरिबांचे वडापाव हे अन्न आहे.

बटाटा वडा रेसिपी Archived 2016-08-13 at the वेबॅक मशीन.