बचेंद्री पाल
Jump to navigation
Jump to search
बचेंद्री पाल ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. तिने मे २३, इ.स. १९८४ रोजी जगातील सगळ्यात उंच शिखर, एव्हरेस्ट सर केले. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत.
त्यांचा जन्म १९५४ मध्ये भारतातील उत्तराखंड राज्यातील गढवाल भागातील नाकुरी गावात झाला. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यापैकी काही पुढील प्रमाणे:
मिळालेले पुरस्कार[संपादन]
- भारतीय पर्वतारोहण फाउंडेशन तर्फे गिर्यारोहणाकरिता सुवर्ण पदक (1984)
- पद्मश्री(1984) पुरस्काराने सम्मानित
- उत्तर प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे सुवर्ण पदक (1985)
- अर्जुन पुरस्कार (1986)
- कोलकाता लेडीज स्टडी ग्रुप अवार्ड (1986)
- गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड्स (1990) मध्ये नोंद
- भारत सरकार तर्फे एडवेंचर अवार्ड (1994)
- उत्तर प्रदेश सरकार कडून यशभारती सन्मान(1995)
- हेमवती नन्दन बहुगुणा गढ़वाल विश्वविद्यापीठाकडून मानद पी एच डी उपाधि (1997)
- संस्कृति मंत्रालय, मध्य प्रदेश सरकार कडून पहिला वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय सन्मान (2013-14)
- पद्मभूषण पुरस्कार(२०१९)[१]
बाह्य दुवे[संपादन]
- ^ "पद्म पुरस्कार यादी". २८ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.