बंडू आंदेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सूर्यकांत ऊर्फ बंडूअण्णा आंदेकर (इ.स. १९५५ - ) हा पुणे शहराच्या मध्यभागात दहशत माजवणारा एक गुंड आहे. त्याची टोळी आंदेकर टोळी या नावाने ओळखली जाते.

या आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत आंदेकरविरुद्ध सन १९८५पासून खून, खुनाचे प्रयत्‍न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुण्यातील फरासखाना, खडक व समर्थ या पोलीस ठाण्यांत, तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

आंदेकर-माळवदकर टोळीयुद्धातून झालेल्या खूनप्रकरणात सूर्यकांत आंदेकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवायांना सुरुवात केली. त्याच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक तक्रार करण्यासही घाबरतात.

सू्र्यकांत आंदेकरचा भाऊ उदयकांत हा पुणे महापालिकेत २०१२पासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नगरसेवक आहे.

आंदेकर टोळीतील गुंड[संपादन]

  • सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (टोळीचा प्रमुख, जन्म : इ.स. १९५५)
  • त्याचा पुतण्या शिवम् उर्फ शुभम् उदयकांत आंदेकर (जन्म : १९९६)
  • सागर अर्जुन शिंदे (जन्म : १९८२)
  • प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (जन्म : १९९१)
  • दानीश मुशीर शेख (जन्म : १९९३)
  • अक्षय दशरथ अकोलकर (जन्म : १९९४)
  • कुणाल सोमनाथ रावळ (जन्म : १९९२)
  • तुषार बाळू भगत (जन्म : १९९३)
  • राहुल सुरेश खेत्रे (जन्म : इ.स. १९८०)

हे सर्व गुंड पुण्यातील नाना पेठेत राहतात. दरवर्षी सणांच्या किंवा निवडणुकांच्या पूर्वी आंदेकर टोळीतील गुंडांना तडीपार करण्यात येते.

गुंडगिरीची पार्श्वभूमी असली तरी आंदेकर टोळीतील कुटुंबीय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आहेत. त्या पक्षाने पुरस्कृत केलेले उदयकांत आंदेकर आणि जयश्री आंदेकर हे इ.स. २०१२ साली निवडून आले व पुणे महापालिकेचे नगरसेवक झाले. पैकी राजश्री आंदेकर यांचे २०१६ साली निधन झाले.