बंकर हिल (कॅन्सस)
Appearance
बंकर हिल (कॅन्सस)
| स्थापना | 1871 |
|---|---|
| अधिकृत नाव | Bunker Hill |
| देश | अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | रसेल काउंटी (कॅन्सस) |
| भौगोलिक गुणक | ३८°५२′२९″N ९८°४२′१०″W |
| डाक संकेतांक | 67626 |
| स्थानिक दूरध्वनी कोड | 785 |


हा लेख कॅन्सस राज्यातील बंकर हिल शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बंकर हिल (निःसंदिग्धीकरण).
बंकर हिल हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील रसेल काउंटीमधील एक छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०३ होती [१]
जे.बी. कॉर्बेट आणि व्हॅलेंटाईन हार्बाओ या ओहायोमधून येथे आलेल्या लोकांनी १८७१ च्या उन्हाळ्यात कॅन्सस पॅसिफिक रेल्वेवर बंकर हिलची स्थापना केली. [२] येथे बटरफिल्ड ओव्हरलँड डिस्पॅच या टपाल व मालवाहतूक करणाऱ्या कंपनीच्या स्थानकाचे नाव दिले गेले. [३] रसेल काउंटी प्रशासकांनी १८७२मध्ये बंकर हिलला काउंटीचे प्रशासकीय केन्द्र घोषित केले परंतु दोन वर्षांनंतर झालेल्या मतदानामुळी शेजारचे रसेल शहर काउंटीचे प्रशासकीय केन्द्र झाले. यासह बंकर हिलमधील मोठ्या प्रमाणातील रहिवाशांनी रसेलला स्थलांतर केले व त्यामुळे बंकर हिलची वाढ खुंटली. तरीही १८८३मध्ये येथे एक हॉटेल, पिठाची गिरणी आणि अनेक दुकाने यांसह अनेक व्यवसाय उभे राहिले होते.
जवळची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "Profile of Bunker Hill, Kansas in 2020". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. March 21, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 21, 2022 रोजी पाहिले.
- ↑ Kansas State Historical Society (1916). Biennial Report of the Board of Directors of the Kansas State Historical Society. Kansas State Printing Plant. pp. 279.
- ↑ "The Early History of Russell County". Russell County Historical Society. August 13, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 17, 2010 रोजी पाहिले.