फ्लॅनरी ओ'कॉनोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेरी फ्लॅनरी ओ'कॉनोर (२५ मार्च, इ.स. १९४२:सवानाह, जॉर्जिया, अमेरिका - ३ ऑगस्ट, इ.स. १९६४:मिलेजव्हिल, जॉर्जिया, अमेरिका) ही अमेरिकन लेखिका होती. हिने २ कादंबऱ्या आणि ३२ लघुकथा लिहिल्या. ओ'कॉनोर अमेरिकेच्या दक्षिणेतील लेखिका असून तिच्या लिखाणाची शैली सदर्न गॉथिक होती.

ओ'कॉनोर आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या आईसोबत मिलेजव्हिल येथे राहण्यास गेली. तेथील पीबॉडी हायस्कूलमध्ये शिकत असताना ती तेथील नियतकालिकाची कलासंपादक होती. त्यानंतर तिने जॉर्जिया कॉलेज अँड स्टेट युनिव्हर्सिटीतून तीन वर्षांत समाजशास्त्राची पदवी मिळवली. ओ'कॉनोरने आयोवा विद्यापीठात पत्रकारितेचा अभ्यासही केला.