फ्रांसचा सहावा लुई
Appearance
(फ्रान्सचा सहावा लुई या पानावरून पुनर्निर्देशित)
सहावा लुई तथा जाड्या लुई[१] (१ डिसेंबर, १०८१ - १ ऑगस्ट, ११३७) हा ११०८ ते ११३७ पर्यंत फ्रँक्सचा राजा होता [२] त्याचे वडील पहिल्या फिलिप यांच्याप्रमाणे, लुईने शाही सत्तेच्या संस्थांचे केंद्रीकरण करण्यात कायमस्वरूपी योगदान दिले. [३] त्याने आपल्या एकोणतीस वर्षांच्या कारकिर्दीचा बराचसा काळ इले दे फ्रान्सला त्रास देणाऱ्या लुटारू बॅरन्स आणि नॉर्मंडीच्या ताब्यासाठी इंग्लंडचा हेन्री पहिला यांच्याशी लढण्यात घालवला. असे असताही लुईने फ्रांसवरील आपली पकड मजबूत ठेवली. संपूर्ण फ्रांसला लागू होणारे आदेश जारी करणारा कॅपे घराण्याचा तो पहिला सदस्य होता. [४]
संदर्भ
[संपादन]- ^ Bradbury 2007, पान. 131.
- ^ Luchaire 1890.
- ^ Cantor 1993, पान. 410.
- ^ van Caenegem 1988.