Jump to content

फ्रांझ मेस्मेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रांझ अँटोन मेस्मेर (२३ मे, १७३४ - ५ मार्च, १८१५) हे खगोलशास्त्रात रस असलेले जर्मन वैद्य होते. त्यांनी सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये होणाऱ्या नैसर्गिक ऊर्जा हस्तांतरणाच्या प्रक्रियेच्या अस्तित्वाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या या सिद्धांताला १७८० ते १८५० दरम्यान मोठ्या प्रमाणात अनुयायी मिळाले आणि १९ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत त्याचा काहीसा प्रभाव राहिला. १८४३ मध्ये, स्कॉटिश डॉक्टर जेम्स ब्रेड यांनी प्राण्यांच्या चुंबकत्वापासून मिळवलेल्या तंत्राला हिप्नोटिझम (संमोहन) असे म्हणले. आता मेस्मेरिझम हा शब्द सामान्यतः संमोहनला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. मेस्मेर यांची हेडन आणि मोझार्टशी मैत्री होती.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]