Jump to content

फौजासिंग (खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Fauja Singh; Faudzsa Szing; فوجا سِنٛگھ; Fauja Singh; Фауджа Сингх; Fauja Singh; Fauja Singh; Ֆաուջա Սինգհ; Fauja Singh; فوجا سنگھ; ファウジャ・シン; Fauja Singh; Fauja Singh; Фауджа Сінгх; फौजा सिंह; ఫౌజా సింగ్; Fauja Singh; Фауджа Сингх; Fauja Singh; Fauja Singh; ফৌজা সিং; Fauja Singh; फौजा सिंग धिंडसा; ਫ਼ੌਜਾ ਸਿੰਘ; Fauja Singh; Fauja Singh; فوجا سنگھ; فوجا سینگ; Fauja Singh; Fauja Singh; Fauja Singh; Fauja Singh; Fauja Singh; ฟาวจา สิงห์; Fauja Singh; ഫൗജ സിംഗ്; Fauja Singh; فوجا سينج; Fauja Singh; Fauja Singh; Fauja Singh; Fauja Singh; فوغا سينغ; 파우자 싱; ফৌজা সিং; maratoneta britannico (1911-2025); ভারতীয় অ্যাথলেট; brit-indiai korrekorder hosszútávfutó; Suurbritannia sportlane; atleta britànic; British-Indian centenarian marathon runner; indischer Marathonläufer und angeblich ältester Marathonläufer der Welt; British athlete; دونده ماراتون; atleta británico; atlet britanic; インド出身のマラソン選手; atlet britanik; عدَّاء هندي بريطاني; אתלט בריטי; brytyjski maratończyk; британський марафонець і довгожитель; Brits marathonloper; ਬਜੁਰਗ ਦੌੜਾਕ; atleta británico; старейший в мире финишёр марафона; brittiläis-intialainen kestävyysjuoksija; British-Indian centenarian marathon runner; British athlete; athlète britannique; 영국계 인도인의 마라토너 (1911–2025); Fouja Singh; フォジャ・シン; Fauja Singh; Сингх, Фауджа
फौजा सिंग धिंडसा 
British-Indian centenarian marathon runner
माध्यमे अपभारण करा
उच्चारणाचा श्राव्यपंजाबी भाषा
स्थानिक भाषेतील नाव
  • ਫੌਜਾ ਸਿੰਘ
जन्म तारीखएप्रिल १, इ.स. १९११
जालंधर
मृत्यू तारीखजुलै १४, इ.स. २०२५
जालंधर
मृत्युची पद्धत
  • accidental death
मृत्युचे कारण
  • traffic collision
नागरिकत्व
कोणत्या देशामार्फत खेळला
निवासस्थान
व्यवसाय
  • marathon runner
  • long-distance runner
  • धावपटू स्पर्धक
Sports discipline competed in
मातृभाषा
पुरस्कार
  • British Empire Medal
  • Ellis Island Medal of Honor
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q888234
आयएसएनआय ओळखण: 0000000357179817
व्हीआयएएफ ओळखण: 186884186
जीएनडी ओळखण: 1023468735
एलसीसीएन ओळखण: n2010215523
आय.एम.डी.बी. दुवा: nm9980763
World Athletics athlete ID: किंमत टाकलेली नाही
विकिडाटावर माहिती संपादित करा

फौजा सिंग धिंडसा हे सर्वाधिक वयाचे धावपटू होते.त्यांचा जन्म १ एप्रिल १९११ रोजी झाला होता.

बालपण

[संपादन]

फौजा सिंग ह्यांचा जन्म १ एप्रिल १९११ रोजी झाला.ते पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना नीट चालता येत नव्हते एवढे ते शरीराने कमजोर होते.

मॅरॅथॉन खेळ

[संपादन]

फौजा सिंग नी वयाच्या ८९ वर्षी मॅरॅथॉन धावण्याची सुरुवात केली.सुरुवातीला त्यांनी इलफोर्ड पार्कमध्ये लांब चालण्याचा सराव केला आणि नंतर लांब पल्ल्याच्या धावण्याची सुरुवात केली.त्यांचे हरमिंदर नावाचे मॅरॅथॉन प्रशिक्षक होते.त्यांच्या मॅरॅथॉन शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी लोक कल्याणासाठी मॅरॅथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी सुरुवात केली. इसवी सन १९९३ मध्ये त्यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या पत्नी गिआन कौर ह्यांचे एका अपघातात निधन झाले.त्यांच्या मुलाचे ही निधन झाल्यामुळे त्यांना नैराश्य आले आणि नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी धावण्यावर एकाग्रता केली.असे त्यांच्या टर्बन्ड टोरनाडो ह्या आत्मचरित्र पुस्तकात लिहिले आहे. इसवी सन २००१ मध्ये त्यांनी प्रथमच लंडन मॅरॅथॉन स्पर्धेत भाग घेतला. त्यावेळी ते एकोणनव्वद वर्षांचे होते. त्यावेळी त्यांनी ४२.२ किलोमीटर अंतर सहा तास चौपन्न मिनिटात पूर्ण केले होते. त्यांनी १०० वर्षे वय असताना [[टोरांटो वॉटर फ्रंट मॅरॅथॉन पूर्ण केली होती. त्यासाठी त्यांना आठ तास अकरा मिनिटे लागली होती. नंतर त्यांनी लंडनमध्ये सात तास एकोणपन्नास मिनिटात मॅरॅथॉन पूर्ण केली होती. इसवी सन २००१ ते २०१२ पर्यंत त्यांनी ९ मॅरॅथॉन पूर्ण केल्या होत्या. इसवी सन २०१२ नंतर त्यांनी दहा किलोमीटर शर्यतीतच भाग घेण्यास सुरुवात केली.इसवी सन २०१३ मध्ये त्यांनी शेवटच्या शर्यतीत भाग घेतला. त्यांना लंडन ऑलिम्पिक ज्योत वाहून नेण्याचा मान मिळाला होता. मॅरॅथॉन धावण्याची स्पर्धा ह्या खेळासाठी दीर्घकाळ धावण्याची क्षमता तयार करणे आवश्यक असते.दररोज सराव करणे फार गरजेचे असते.तसेच त्यात वेग नेमका ठेवून शेवटपर्यंत थकवा येऊ न देणे गरजेचे असते.

शेवट

[संपादन]

फौजासिंग ह्यांंचे ११४ वर्षी सोमवार दिनांक १४ जुलै २०२५ रोजी जालंधर येथील बिआस पिंड येथे झालेल्या एका वाहन अपघातात निधन झाले.[] कँनडा येथे वास्तव्यास असलेल्या अमृतपाल सिंग धिल्लो असे धडक दिलेल्या वाहन चालकाचे नाव आहे असे समजले आहे.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. महाराष्ट्र टाईम्स, बुधवार,१६ जुलै २०२५
  2. महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,१७ जुलै २०२५