फैझ अहमद फैझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


फैझ अहमद फैझ
जन्म १३ फेब्रुवारी, इ.स. १९११
पंजाब प्रांत (ब्रिटिश भारत)
मृत्यू २० नोव्हेंबर, इ.स. १९८४
लाहोर, पाकिस्तान
राष्ट्रीयत्व पाकिस्तानी
धर्म इस्लाम
कार्यक्षेत्र साहित्य, सैन्य
भाषा उर्दू
साहित्य प्रकार शायरी
संघटना ब्रिटिश भारतीय सैन्य
प्रसिद्ध साहित्यकृती हम देखेंगे
पुरस्कार लेनिन शांतता पुरस्कार, निशान-ए-इम्तियाज

फैझ अहमद फैझ (उर्दू : فیض احمد فیض, १९११-८४) एक पाकिस्तानी कवी होते. त्यांच्या क्रांतिकारी रचनानांमध्ये इंकलाबी आणि रूमानी रसिक भावांच्या मेळासाठी त्यांना ओळखले जाते. लष्कर, तुरुंग व निर्वासनेत जीवन व्यतीत करताना फैझ ह्यांनी बऱ्याच उर्दू नज्म व गझल लिहिल्या. तसेच उर्दू शायरीमध्ये आधुनिक प्रगतिवादी (पुरोगामी) काळाच्या रचना घडवल्या. त्यांना नोबेल पारितोषिकासाठी पण नामांकित करण्यात आले होते. फैझ वर बरेच वेळी कम्युनिस्ट (साम्यवादी) असल्याचे आणि इस्लामपासून वेगळे राहण्याचे आरोप लावले जायचे पण त्यांच्या रचनांमध्ये गैरइस्लामी रंग सापडत नाही. तुरुंगवासात त्यांनी लिहिलेली कविता 'ज़िन्दान-नामा' हिला प्रचंड पसंती मिळाली होती. त्यांनी लिहिलेल्या काही ओळी आता भारत-पाकिस्तानच्या सर्वसामान्य बोली भाषेचा हिस्सा बनल्या आहेत, उदा. 'और भी ग़म हैं ज़माने में मुहब्बत के सिवा' (अर्थ : समाजात प्रेमाव्यतिरिक्त इरतही दुःख आहेत.)