Jump to content

फेय डनअवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फेय डनअवे
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावFaye Dunaway संपादन
दिलेले नावFaye संपादन
आडनावDunaway संपादन
जन्म तारीख१४ जानेवारी 1941 संपादन
जन्मस्थानBascom संपादन
वैवाहिक जोडीदारPeter Wolf, Terry O'Neill संपादन
सहचरMarcello Mastroianni संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाBoston University College of Fine Arts, University of Florida, Florida State University, Leon High School, HB Studio संपादन
कर्मस्थळअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1962 संपादन
वैद्यकीय स्थितीबायपोलर डिसऑर्डर (मानसिक आजार) संपादन
FilmographyFaye Dunaway filmography संपादन
HashtagFayeDunaway संपादन
Related categoryCategory:Films directed by Faye Dunaway संपादन
Documentation files atSAPA Foundation, Swiss Archive of the Performing Arts संपादन

डोरोथी फे डनवे (जन्म १४ जानेवारी १९४१)[] एक अमेरिकन अभिनेत्री आहे. तिला एक अकादमी पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार, तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक बाफ्टा पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०११ मध्ये, फ्रान्स सरकारने तिला ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सची अधिकारी बनवले.

तिची कारकीर्द १९६० च्या सुरुवातीस ब्रॉडवेवर सुरू झाली. तिने १९६७ च्या द हॅपनिंग चित्रपटातून पडद्यावर पदार्पण केले. त्याच वर्षी तिने अनेक कलाकारांसह हरी सनडाउन मध्ये काम केले आणि आर्थर पेनच्या बोनी अँड क्लाइड मधील अमेरिकन डाकू बोनी पार्करच्या भूमिकेने प्रसिद्धी मिळवली. ह्यासाठी तिला बाफ्टा पुरस्कार मिळाला व पहिले अकादमी पुरस्कार नामांकन देखील. तिच्या सर्वात उल्लेखनीय चित्रपटांमध्ये द थॉमस क्राउन अफेअर (१९६८), द अरेंजमेंट (१९६९), लिटल बिग मॅन (१९७०), अलेक्झांड्रे ड्यूमासचा क्लासिक द थ्री मस्केटियर्स (१९७३), १९७४ मधील द फोर मस्केटियर्स, निओ-नॉयर चायनाटाउन (१९७४), ज्यासाठी तिने तिचे दुसरे ऑस्कर नामांकन मिळवले, ॲक्शन-ड्रामा द टॉवरिंग इन्फर्नो (१९७४), राजकीय थ्रिलर थ्री डेज ऑफ द कॉन्डोर (१९७५), विडंबन चित्रपट नेटवर्क (१९७६) ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला, आणि थ्रिलर आईज ऑफ लॉरा मार्स (१९७८) हे आहेत.

१९८१ च्या मॉमी डिअरेस्ट या चित्रपटातील जोन क्रॉफर्डच्या (एक अमेरिकन अभिनेत्री) वादग्रस्त चित्रणापासून तिच्या कारकीर्दीत अधिक परिपक्व पात्र भूमिका साकारल्या गेल्या. सुपरगर्ल (१९८४), बारफ्लाय (१९८७), द हँडमेड्स टेल (१९९०), ॲरिझोना ड्रीम (१९९४), डॉन जुआन डीमार्को (१९९५), द ट्वायलाइट ऑफ द गोल्ड्स (१९९७), जिया (१९९८) आणि द रुल्स ऑफ अट्रॅक्शन (२००२) यांचा इतर उल्लेखनीय चित्रपटांचा समावेश आहे. ड्युनावेने अनेक नाटकांमध्ये रंगमंचावर सादरीकरण केले आहे, ज्यात अ मॅन फॉर ऑल सीझन्स (१९६१-६३), आफ्टर द फॉल (१९६४), होगन्स गोट (१९६५-६७), आणि अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर (१९७३) यांचा समावेश आहे. मास्टर क्लास (१९९६) मधील ऑपेरा गायिका मारिया कॅलासच्या भूमिकेसाठी तिला सारा सिडन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तिच्या खाजगी जीवनाचे संरक्षण करून, ती क्वचितच मुलाखती देते आणि खूप कमी सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावते.

डनवेचा जन्म फ्लोरिडा येथील बास्कोम येथे झाला. ती ग्रेस एप्रिल (गृहिणी ) आणि जॉन मॅकडोवेल डनवे जूनियर (युनायटेड स्टेट्स आर्मीमधील अधिकारी) यांची मुलगी. तिच्या पालकांनी १९३९ मध्ये लग्न केले आणि १९५४ मध्ये घटस्फोट घेतला. तिला एक लहान भाऊ होता, वकील मॅक सिमियन ड्युनावे.[]तिने तिचे बालपण संपूर्ण युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये प्रवासात घालवले, ज्यात मानहाइम, जर्मनी आणि युटा येथे ती दीर्घकाळ राहिली.[]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

१९६२ मध्ये, डनवेचे स्टँड-अप कॉमेडियन लेनी ब्रूससोबत संबंध सुरू झाले जे एक वर्ष टिकले.[] १९६७ ते १९६८ या कालावधीत छायाचित्रकार जेरी स्चॅट्झबर्गशी तिचं लग्न झाल. नंतर ते दोघे मित्र राहिले आणि डनवेने स्चॅट्झबर्गच्या दिग्दर्शनातल्या पदार्पण चित्रपटात (पझल ऑफ अ डाउनफॉल चाइल्ड - १९७०) मध्ये अभिनय केला. ए प्लेस फॉर लव्हर्स (१९६८) च्या चित्रीकरणादरम्यान, डनवे तिच्या सह-कलाकार मार्सेलो मास्ट्रोइन्नीच्या प्रेमात पडली. दोघांचे दोन वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिप होते. डनवेला लग्न करायचं होतं पण मास्ट्रोइन्नी कायदेशीररित्या विवाहित होता. शेवटी डनवेने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला.

डनवे १९७१-७२ दरम्यान अभिनेता हॅरिस युलिन सोबत होती. १९७४ मध्ये, तिने पीटर वुल्फशी विवाह केला, जो रॉक ग्रुप द जे. गील्स बँडचा प्रमुख गायक होता . त्यांच्या कारकिर्दीतील वचनबद्धतेमुळे ते वारंवार विभक्त होत होते आणि दोघांचा १९७९ मध्ये घटस्फोट झाला. तिचा दुसरा पती, ब्रिटिश छायाचित्रकार टेरी ओ'नील सोबत १९८३ मध्ये लग्न केले.

ओ'नीलपासून घटस्फोट घेतल्यानंतर डनवे ही इंग्रजी लेखक फ्रेडरिक फोरसाइथशी संबंधीत होती.[] त्यानंतर वॉर्नर ब्रदर्सचे होम व्हिडिओचे अध्यक्ष वॉरन लीबरफार्ब, सोबत तिचे तीन वर्षांचे नाते होते.[][]

डनवे एक धर्माभिमानी कॅथलिक आहे आणि तिने सांगितले की ती नियमितपणे सकाळच्या मासला उपस्थित राहते. तिने १९९६ मध्ये धर्मांतर केले, तोपर्यंत ती प्रोटेस्टंट होती.

संदर्भ

[संपादन]
  1. "Today's famous birthdays list for January 14, 2022 includes celebrities LL Cool J, Jason Bateman". Cleveland.com. January 14, 2022. February 2, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 2, 2022 रोजी पाहिले.
  2. Home, Sauls Funeral. "Obituary for Mac Simmion Dunaway | Sauls Funeral Home". Obituary for Mac Simmion Dunaway | Sauls Funeral Home.
  3. Dunaway (1995).
  4. Dunaway (1995), pp. 68–72.
  5. New York Daily News. August 25, 1987. p. 16.
  6. Jarvis, Elena (June 5, 1992). "Playing hooks and living blue". Ventura County Star.
  7. Léo Carrier (2018). Stars et voyous IV. Editions Publibook. p. 56. ISBN 978-2342164480.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत