फॅब अकॅडेमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फॅब लॅब ही अमेरिकेच्या एमआयटी संस्थेतील एक प्रयोगशाळा आहे.

डॉ. नील ग्रेशनफिल्ड यांनी ८ वर्षापूर्वी फॅब लॅबच्या नेटवर्कचा वापर करून MIT तील ‘How to make almost anything’ हा कोर्स फॅब अकॅडेमी नावाने शिकवण्यास सुरुवात केली.डॉ. नील ग्रेशान्फिल्ड यांच्या संकल्पनेतून जगभर ‘फॅब लॅब’ चे नेटवर्क उभे राहिले आहे. आज जगात १३००+ फॅब लॅब कार्यरत आहेत. ‘You can make almost anything’ हेच फॅब लॅबचे ब्रीदवाक्य आहे. प्रत्येक फॅब लॅब हि आवश्यक अशा आधुनिक मशीनने सुसज्ज असते. लेझर कटिंग मशीन, CNC मिलिंग, ३D प्रिंटर, व्हिनाईल कटिंग यांच्या जोडीला पारंपारिक हत्यारे व साधने यांचा या लॅब मध्ये समावेश होतो. या सर्व लॅब एकाच प्रकारची साधने व software वापरतात. त्यामुळे एका लॅब मधील डिझाईन हे दुस-या लॅब ला इंटरनेट व्दारे पाठवून ती वस्तू बनवता येते. या सर्व लॅब मध्ये सर्वांना काही अटीचे पालन करून व शुल्क देऊन मशीनचा वापर करता येतो. Learn , Make , share या तत्वाचे सर्व लॅब पालन करतात.

Fab Academy Session
Working in fab lab

ओळख[संपादन]

फॅब लॅब म्हणजे डिजिटल युगातील अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असलेली लॅब कि ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी / प्रयोग मूर्त स्वरुपात आणू शकतात . डॉ. नील ग्रेशन्फिल्ड यांच्या संकल्पनेतून जगभर ‘फॅब लॅब’ चे नेटवर्क उभे राहिले आहे. आज जगात १६००+ फॅब लॅब कार्यरत आहेत. ‘You can make almost anything’ हेच फॅब लॅबचे ब्रीदवाक्य . प्रत्येक फॅब लॅब हि आवश्यक अशा आधुनिक मशीनने सुसज्ज असते. लेझर कटिंग मशीन,CNC मिलिंग, ३D प्रिंटर, व्हिनाईल कटिंग यांच्या जोडीला पारंपारिक हत्यारे व साधने यांचा या लॅब मध्ये समावेश होतो. या सर्व लॅब एकाच प्रकारची साधने व software वापरतात. त्यामुळे एका लॅब मधील डिझाईन हे दुस-या लॅब ला इंटरनेट व्दारे पाठवून ती वस्तू बनवता येते. या सर्व लॅब मध्ये सर्वांना काही अटीचे पालन करून व शुल्क देऊन मशीनचा वापर करता येतो.Learn ,Make , share या तत्वाचे सर्व लॅब पालन करतात. वर सांगितल्याप्रमाणे एक ‘फॅब लॅब’ ही पाबळ या पुण्यापासून ७० कि.मी. वरच्या छोट्या गावात पण आहे. ही फॅब लॅब २००२ मध्ये सुरु झाली व जगातील पहिली फॅब लॅब (फॅब लॅब 0) असण्याचा मान पण विज्ञान आश्रमाला आहे.

अश्या या नवीन गोष्टीनी अद्ययावत असलेल्या फॅब लॅब मध्ये काम करण्याची माझ्याकडे संधी होती व यासाठी मला आवश्यक लागणारी सगळी कौशल्ये शिकून घ्यावी लागणार होती . जगामध्ये नवीन येत असलेल्या तंत्र ज्ञानाची माहिती फॅब लॅब मध्ये मिळत असते वत्यापैकी बऱ्याच गोष्टी येथे करूनही पहिल्या जातात . हे सगळ्या गोष्टी शिकून घेण्यासाठी मी फॅब लॅब मध्ये चालणारा फॅब अकॅडेमी नावाचा कोर्स करण्याचे ठरविले . या ६ महिन्याच्या कोर्स मध्ये २० assignments व त्यामधील गोष्टी वापरून एक प्रकल्प बनवायचा होता .

कोर्सची माहिती (How to Make Almost Anything)[संपादन]

जगभरातील विविध देशातील ८० फॅब लॅबमध्ये एकाचवेळी हा कोर्स चालतो.याचा साधारण कालावधी दरवर्षी जानेवारी ते जून असा ६ महिन्याचा असतो . जागतिक फॅब लॅब नेटवर्क समुदायामध्ये सहभाग आणि नेतृत्वासाठी नवीन विद्यार्थ्यांना आरंभ करणे, मार्गदर्शन करणे आणि तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षण देणे फॅब अ‍ॅकॅडमीची भूमिका आहे. विविध प्रकारच्या डिजिटल फॅब्रिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स, मोल्डिंग आणि कास्टिंग आणि कंपोजिट हि कौशल्य शिकण्यासाठी चांगला मार्ग देखील आहे.MIT, USA मधील प्राध्यापक डॉ. नील ग्रेशनफिल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला फॅब ॲकेडमी हा कोर्सं हे स्वायत्त व मुक्त शिक्षणाचा आदर्श म्हटला पाहिजे. आभासी जग व भौतिक जग यांचा कसा समन्वय परिणामकारकपणे कसा करता येईल याचे फॅब ॲकेडमी हे उदाहरण म्हटले पाहिजे. डॉ. नील हे MIT या संस्थेत ‘How to make almost anything’ नावाचा कोर्स चालवतात. सहा महिन्याचा हा कोर्स MIT तील विद्यार्थी क्रेडिट कोर्स म्हणून घेतात. तुमच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी सर्व कौशल्य तुम्हाला या कोर्स मध्ये शिकता येतात.

संगणीकृत आरेखनाच्या (drawing) मदतीने लेझर कटींग, ३D प्रिंटींग, CNC router अशी अत्याधुनिक मशीन वापरून मनातील कल्पना प्रत्यक्षात उतरवाण्यास विद्यार्थी शिकतात. इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स, प्रोग्रामिंग करून वस्तू स्वयंचलित,प्रोग्रामवर चालणाऱ्या बनवायला शिकतात. विविध मशीन्स, रोबोट तसेच मोल्डिंग, कास्टिंगचा वापर अशा उत्पादनातील विविध प्रक्रिया विद्यार्थी शिकतात. आधुनिक अभियंता होण्यासाठी आवश्यक सर्व कौशल्यांनी विद्यार्थी या कोर्समध्ये पारंगत होतो. मात्र या कोर्स ला फार मर्यादित विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तसेच MIT त जाऊन शिकण्याची कोर्से फी पण प्रचंड असते.

असाइनमेंट[संपादन]

संदर्भ व नोंद[संपादन]

[१][२]

  1. ^ "Fab Academy". fabacademy.org. 2020-01-19 रोजी पाहिले. 
  2. ^ "Vigyan Ashram". vigyanashram.com. 2020-01-19 रोजी पाहिले.