फुलब्राइट शिष्यवृत्ती
अमेरिकेतील प्रतिष्ठित शिष्यवृत्ती | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | शिष्यवृत्ती, शासकीय कार्यक्रम, शैक्षणिक संस्था | ||
---|---|---|---|
याचे नावाने नामकरण |
| ||
स्थान | अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
चालक कंपनी |
| ||
स्थापना |
| ||
प्रायोजक |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
फुलब्राइट शिष्यवृत्ती तसेच फुलब्राइट-हेस कार्यक्रम ही अमेरिका आणि इतर देशांमधील लोकांमध्ये सांस्कृतिक चालीरीती, ज्ञान आणि कौशल्यांच्या परस्पर देवाणघेवाणीद्वारे संबंध वाढविण्यासाठीच्या सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांपैकी प्रमुख कार्यक्रम. याची सुरुवात १९४६ मध्ये अमेरिकेचे सेनेटर जे. विल्यम फुलब्राइट यांनी केली होती. ही शिष्यवृत्ती अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठित शिष्यवृत्तींपैकी एक मानली जाते. [१]
या कार्यक्रमाद्वारे अमेरिकेतून स्पर्धात्मकरित्या निवडलेले विद्यार्थी, विद्वान, शिक्षक, व्यावसायिक, शास्त्रज्ञ आणि कलाकारां परदेशात अभ्यास करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी, शिकवण्यासाठी किंवा त्यांच्या प्रतिभेचा वापर करण्यासाठी शिष्यवृत्ती किंवा अनुदान दिले जाते. हे अमेरिकन नागरिक असणे आवश्यक आहे. मिळवू शकतात. याचबरोबर आणि इतर देशांच्या नागरिकांनाही अशीच शिष्यवृत्ती किंवा अनुदान दिले जाते. हा कार्यक्रमातून दरवर्षी सुमारे ८,००० व्यक्तींना शिष्यवृत्ती दिली जाते. यात १,६०० अमेरिकन विद्यार्थी, १,२०० अमेरिकन विद्वान तर ४,००० परदेशी विद्यार्थी आणि ९०० परदेशातून अमेरिकेला भेट देणाऱ्या विद्वानांचा समावेश असतो. याशिवाय आणि शेकडो शिक्षक आणि व्यावसायिकांना दिली जातात. [२]

उल्लेखनीय माजी लाभार्थी
[संपादन]फुलब्राइट लाभार्थींनी सरकार, शैक्षणिक संस्था आणि उद्योगात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अशा ३२५,००० हून अधिक लाभार्थींपैकी:
- ८९ जणांना पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे [३]
- ७८ जण मॅकआर्थर फेलो आहेत [३]
- ६२ जणांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे [३]
- ४० जण राष्ट्रप्रमुख झाले [४] [३]
- १० जण अमेरिकन काँग्रेसमध्ये निवडून आले आहेत.
- १ संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस झाले.
निवडक फुलब्राइट लाभार्थी
[संपादन]- एडवर्ड आल्बी, नाट्यकलेसाठी ३ वेळा पुलित्झर पारितोषिक विजेता
- बूट्रोस बूट्रोस-घाली, इजिप्ती राजकारणी आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस, १९९२-९६
- कोफी अब्रेफा बुसिआ, घानाचे पंतप्रधान, १९६९-७२
- फेर्नांदे एनरिके कार्दोसो, ब्राझिलचे राष्ट्राध्यख, १९९५-२००२[५]
- बॉब कार, ऑस्ट्रेलियाचा राजकारणी[६]
- डेल चिहुली, काचशिल्पकार[७]
- लिआह कर्टिस, ऑस्ट्रेलियाची संगीतकार[८]
- रिटा डव्ह, अमेरिकन पोएट लॉरिएट आणि पुलित्झर पुरस्कार विजेती
- राधिका गज्जालाल, अमरेिकन प्राध्यापिका
- अशरफ घनी, अफगाणिस्तानेच राष्ट्राध्यक्ष[९]
- गॅबी गिफर्ड्स, अॅरिझोनातील अमेरिकेचे प्रतिनिधी
- नायजेल हीली, फिजी राष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरु
- राहुल एम जिंदाल, भारती अमेरिकन डॉक्टर
- कॅरी लॅम, हाँग काँगचे मुख्याधिकारी, २०१७-२२[१०]
- जॉन लिथगो, अभिनेता
- डॉल्फ लुंडग्रेन, अभिनेता
- जमील महुआद, इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष, १९९८-२०००
- बैद्यनाथ मिश्रा, ओडिशा शेतकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु
- डॅनियल पॅट्रिक मॉयनिहॅन, अमेरिकेचे सेनेटर आणि राजदूत
- निहारिका रायझादा, अभिनेत्री
- मरिया रेस्सा, नोबेल पारितोषिक विजेती
- माही आर. सिंग, भौतिकशास्त्राचे प्राध्यापक
- रिशी सुनक, युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान
- मुहम्मद युनुस, नोबेल पारितोषिक विजेते
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Get Noticed Through Prestigious Scholarships". U.S. News & World Report. November 25, 2011. March 22, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 22, 2018 रोजी पाहिले.
- ^ "Fulbright Scholar Program: About Us". Comparative and International Education Society. June 21, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 23, 2017 रोजी पाहिले.
- ^ a b c d "Notable Fulbrighters". U.S. Department of State. October 20, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 27, 2022 रोजी पाहिले.
- ^ "Heads of State/Government". www.State.Gov. US State Department. March 6, 2020. July 21, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 6, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Fernando Henrique Cardoso". Fulbright Association. November 11, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 11, 2014 रोजी पाहिले.
- ^ Adams, Vanessa (August 29, 2017). "Announcing our Inaugural Conference Keynote – Professor the Hon Bob Carr". Fulbright Australia. June 12, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 9, 2018 रोजी पाहिले.
- ^ Lewis, Jo Ann (February 23, 1996). "Glass that'll bowl you over". The Washington Post. June 12, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 9, 2018 रोजी पाहिले.
- ^ "'New' alumnus wins prestigious Fulbright postgraduate award". New College, University of New South Wales. October 28, 2012 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Ashraf Ghani Fast Facts". CNN. December 30, 2019. February 26, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 25, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Carrie Lam: Hong Kong leader who ushered in era of Beijing's supremacy". Straits Times. April 4, 2022. May 20, 2022 रोजी पाहिले.